गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून ताकत लावली जात आहे, भाजप-कॉंग्रेस निवडणुकीसाठी मैदानात उतरलेले पाहायला मिळत आहे. यादरम्यान गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. गुजरातच्या मुख्यमंत्र्यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओवर आप आणि कॉंग्रेसकडून भाजप नेत्यांची खिल्ली उडवली जात आहे.
व्हिडिओ मध्ये काय आहे
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हे ताफ्यामध्ये जाणाऱ्या कारमध्ये चढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. हा ताफा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गाड्यांचा असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान कारचा दरवाजा उघडतो पण गुजरातचे मुख्यमंत्री त्यात बसू शकत नाहीत आणि गाडी पुढे जाते. बाजूचा गार्ड त्यांना गाडीसोबतच चालत घेऊन जातात. ते देखील गाडीच्या मागोमाग चालत बरेच पुढेपर्यंत जातात. हा व्हिडिओ शेअर करत सोशल मीडिया यूजर्सनी पीएम मोदी आणि गुजरातच्या मुख्यमंत्र्यांची खिल्ली उडवली आहे. तर विरोधकांनी देखील भाजपला घेरलं आहे.
काँग्रेस नेत्यांनी टोमणा मारला
काँग्रेस नेते सुरेंद्र राजपूत यांनी हा व्हिडिओ शेअर करत लिहिले की, पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी गुजरातचे मुख्यमंत्र्याना काय बनवून ठेवलंय. तर काँग्रेस नेते नीरज भाटिया यांनी खिल्ली उडवताना म्हटले आहे की, अरे भाई भाई… मुख्यमंत्री साहेब. तर काँग्रेस नेते श्रीनिवास बीव्ही यांनी टोमणा मारत लिहिले की, अरे भाऊ, ते मुख्यमंत्री आहेत, मंत्रालयातले शिपाई नाही की तुम्ही साहेबांच्या गाडीच्या मागे जेव्हा बघावं तेव्हा त्यांना पळवत राहता.
संजय सिंह यांनीही घेतला समाचार
आम आदमी पार्टीचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांवर खोचक टीका केली ते म्हणाले की, बाप रे पटेल समाजाचा इतका अपमान. बिचाऱ्या गुजरातचे मुख्यमंत्री गाडीत बसायला धावले. पीएम म्हणाले कारच्या मागे धावा, आणखी तुम्ही माझ्यासोबत बसण्याच्या पात्रतेचे झाले नाहीत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.