Crime News sakal
देश

Gujarat News: 96 वर्षांच्या वृद्धाला 35 वर्षांपूर्वीच्या गुन्ह्यासाठी तुरुंगवासाची शिक्षा; काय आहे प्रकरण?

अंथरुणाला खिळलेल्या आणि अनेक आजारांनी त्रस्त असलेल्या 96 वर्षीय व्यक्तीला 35 वर्षे जुन्या बँक फसवणुकीप्रकरणी एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा गुजरातच्या कोर्टानं सुनावली आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

अहमदाबाद : अंथरुणाला खिळलेल्या आणि अनेक आजारांनी त्रस्त असलेल्या 96 वर्षीय व्यक्तीला 35 वर्षे जुन्या बँक फसवणुकीप्रकरणी एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा गुजरातच्या कोर्टानं सुनावली आहे. विशेष म्हणजे या व्यक्तीची प्रकृती सध्या ठीक नाही, तो स्वतःची कामंही स्वतः करु शकत नाही. त्यामुळं खरंतर शिक्षा सुनावलेली ही वृद्ध व्यक्ती कोर्टानं शिक्षा सुनावली त्यावेळी सुनावणीस हजरही राहू शकली नाही. (Gujarat court sentences 96 year-old to one year in prison for committing bank fraud 35 years ago)

अनिल गोसालिया असं या ९६ वर्षीय वृद्ध व्यक्तीचं नाव असून ही व्यक्ती मुंबईची रहिवासी आहे. विशेष सीबीआय न्यायाधीश सी जी मेहता यांनी आरोपीची शारीरिक स्थिती लक्षात घेऊनही त्यांच्याविरुद्ध दोषी ठरल्याचं वॉरंट जारी केलं. यावेळी गोसालियाचे वकील आर जी आहुजा यांनी आपल्या आशिलाची स्थिती न्यायालयाला सांगितली आणि नम्रतेची विनंती केली. (Latest Maharashtra News)

....तर चुकीचा संदेश जाईल

न्यायाधीशांनी गोसालियाच्या वकिलाची विनंती नाकारली आणि नमूद केलं की, "आपण जर आरोपीला दोषी ठरल्यानंतरही तसं जाहीर केलं नाही तर लोकांचा न्याय व्यवस्थेवरील विश्वास कमी होतो आणि कोर्ट अशा प्रकारच्या सामाजिक-आर्थिक गुन्ह्यांमध्ये योग्य प्रतिबंधात्मक शिक्षा देत नाही तोपर्यंत कायद्याचा उद्देशच नष्ट होईल. अन्यायकारक शिक्षा किंवा चुकीची दया समाजाला चुकीचा संदेश देईल" (Marathi Tajya Batmya)

कोर्टात नेमकं काय घडलं?

गोसालिया यांना बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी कोर्टाकडून दोषी ठरवण्यात आलं. त्यांचा ७१ वर्षांचा मुलगा दिलीप आणि ५८ वर्षांचा पुतण्या विमल यांनाही पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दिलीप आणि विमल कोर्टात असल्यानं त्यांना शिक्षा सुनावल्यानंतर लगेच तुरुंगात नेण्यात आलं. पण गोसालियांच्या वकिलानं त्यांना तुरुंगात न पाठवता जामीन देण्याची विनंती कोर्टाला केली, ज्यामुळं त्यांची तुरुंगवारी टळली. (Latest Marathi News)

प्रकरण नेमकं काय?

गोसालिया इंटरनॅशनल या भावनगर येथील कंपनीच्या माध्यमातून, गोसालिया कुटुंबावर १९८९ मध्ये स्टेट बँक ऑफ सौराष्ट्रच्या अधिकाऱ्यांकडं कर्ज मर्यादा वाढवण्याचा कट रचल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. सन 1995 मध्ये हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर सीबीआय तपास करण्यात आला हा खटला 26 वर्षे चालला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT