Narendra Modi esakal
देश

Gujarat Election : PM मोदींच्या सुरक्षेत पुन्हा चूक; ड्रोन खाली पाडत एनएसजीनं उधळला कट

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गुजरात दौऱ्यादरम्यान एक मोठी बातमी समोर येत आहे.

सकाळ डिजिटल टीम

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गुजरात दौऱ्यादरम्यान एक मोठी बातमी समोर येत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या गुजरात दौऱ्यादरम्यान एक मोठी बातमी समोर येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एका रॅलीदरम्यान पंतप्रधानांच्या सुरक्षेचा भंग करण्याची तयारी होती. मात्र, एनएसजीनं (NSG) हा कट उधळून लावला आहे.

अहमदाबाद (Ahmedabad) जिल्ह्यातील बावला इथं सुरक्षा यंत्रणांनी एक ड्रोन पाहिला, जिथं पंतप्रधानांची रॅली होणार होती. पंतप्रधानांच्या रॅलीपूर्वी सुरक्षेच्या कारणास्तव हा परिसर 'नो फ्लाय झोन' घोषित केल्यानंतर एनएसजीनं ड्रोन खाली पाडला. मात्र, अद्याप पंतप्रधान कार्यालय किंवा पोलिसांकडून याबाबत काहीही सांगण्यात आलेलं नाही.

दरम्यान, पोलिसांना ड्रोनमध्ये काहीही संशयास्पद आढळलं नाही, असं अहवालात नमूद केलंय. मात्र, हा ड्रोन आकाशात का उडवण्यात आला याचा शोध पोलिस घेत आहेत. ही घटना काल सायंकाळी 4.30 वाजता घडली. याप्रकरणी एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलं आहे. बावलामध्ये पंतप्रधानांच्या रॅलीच्या ठिकाणाजवळ व्हिडिओ रेकॉर्डिंगसाठी एका खासगी छायाचित्रकारानं ड्रोन उडवलं होतं, असं समजतंय. सुरक्षा अधिकाऱ्यांच्या नजरेस पडताच त्यांनी ड्रोन खाली उतरवलं. यानंतर पोलिसांनी कश कालू भाई, निकुल रमेश भाई परमार आणि राजेश प्रजापती अशी तिघांना अटक केली आहे. तिघांचीही चौकशी सुरू आहे. या प्रकरणी पोलिसांनी 'नो फ्लाय झोन'चं उल्लंघन केल्याप्रकरणी एफआयआरही दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

Mayawati : 'बसप' इतर पक्षांसोबत मिळून निवडणूक का लढवत नाही? मायावतींनी सांगितले 'हे' कारण

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Assembly Election: देशात 'चार सौ पार'ला फटका! आता महाराष्ट्रात भाजप ‘बटेंगे तो कटेंगे’मुळे बॅकफूटवर

SCROLL FOR NEXT