भारत जोडो यात्रेमुळं राहुल गांधींची प्रतिमा पूर्णपणे बदललीय, त्यामुळं भाजपनं त्यांची खिल्ली उडवायला सुरुवात केलीय.
Gujarat Assembly Election 2022 : गुजरात विधानसभा निवडणुकीची मतदानाची तारीख जशी जवळ येत आहे, तसतसं राज्यातलं राजकीय वातावरण तापू लागलंय. भाजप (BJP), काँग्रेस (Congress) आणि आम आदमी पक्षांत आतापासूनच आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत.
काही जण विजयाचा दावा करत आहेत, तर काही जण वैयक्तिक आयुष्यावर टीका करताना दिसत आहेत. याच दरम्यान, गुजरातमध्ये निवडणूक प्रचारासाठी पोहोचलेले आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा (Himanta Biswa Sarma) यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर जोरदार टीका केलीय.
भारत जोडो यात्रेमुळं राहुल गांधींची प्रतिमा पूर्णपणे बदललीय. त्यामुळं भाजपनं राहुल यांची खिल्ली उडवायला सुरुवात केलीय. बिस्वा म्हणाले, राहुल गांधी आजकाल इराकचे माजी राष्ट्राध्यक्ष सद्दाम हुसेनसारखे (Saddam Hussein) दिसू लागले आहेत. गांधी वंशजांची प्रतिमा महात्मा गांधी (Mahatma Gandhi) किंवा सरदार पटेल (Sardar Patel) यांच्यासारखी असली पाहिजे, सद्दाम हुसेनसारखी नाही, असा टोला सरमा यांनी लगावलाय.
नुकताच त्यांचा (राहुल गांधी) फोटो पाहिला, त्यांच्या चेहऱ्यामध्ये खूप बदल झालेला दिसत आहे. चेहरा बदलण्यात काहीच नुकसान नाही. पण, चेहरा बदलायचा असेल तर देशाच्या महान व्यक्तींप्रमाणं चेहरा बदलला पाहिजे. आताच राहुल यांचा चेहरा सद्दाम हुसेनसारखा का दिसू लागलाय? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. राहुल यांनी सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्यावर सरमा यांनी सडकून टीका केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.