Rivaba Jadeja sakal
देश

Rivaba Jadeja : कॉन्स्टेबलने मारहाण केलेल्या वादात सापडली जडेजाची पत्नी, कोण आहे रिवाबा

कोण आहेत रिवाबा जडेजा आणि त्यांना भाजपची उमेदवारी का देण्यात आली?

निकिता जंगले

भाजपचा गडकिल्ला समजली जाणारी गुजरात विधानसभा निवडणूक कायमचं चर्चेत असते. यावर्षीच्या विधानसभा निवडणूकीत काही नव्या चेहऱ्यांना उमेदवारी मिळाली पण त्यातला खास चेहरा होता भारतीय क्रिकेटर रविंद्र जडेजा याची पत्नी रिवाबा जडेजा.

यावर्षी भाजपने जामनगर नॉर्थमधून रिवाबा यांना उमेदवारी दिली आणि त्यांनी दणदणीत विजय मिळवला. रिवाबा यांनी तीन वर्षापूर्वी भाजप मध्ये प्रवेश केला होता. कोण आहेत रिवाबा जडेजा आणि त्यांना उमेदवारी का देण्यात आली, याविषयी आपण सविस्तर जाणून घेऊया. (Gujarat Election Result 2022 bjp Rivaba Jadeja life story)

कोण आहेत रिवाबा जडेजा?

रिवाबा या गुजरातमधल्या राजकोटच्या एका मोठ्या उद्योगपतींची मुलगी आली. त्या नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर होत्या.2016 मध्ये रिवाबाने अष्टपैलू क्रिकेटपटू रवींद्र जडेजाशी लग्न केले. रिवाबा यांना लग्नाच्या आधी रीवा सोलंकी या नावाने ओळखले जायचे.

पद्मावत या चित्रपटाविरुद्ध 2018 मध्ये मोठा विरोध प्रदर्शन केल्यामुळे त्यांना करणी सेनेत महिला शाखेच्या प्रमुख पदी नियुक्त करण्यात आले.राजपूत समाजाच्या या करणी सेनेत रिवाबा जडेजा प्रामुख्याने सक्रिय आहेत.2019 मध्ये लोकसभा निवडणुकीआधी रिवाबाने भाजपात प्रवेश केला.

त्यानंतर भाजपच्या अनेक कार्यक्रमात रिवाबाने हजेरी लावली आणि अखेर त्यांना या 2022 च्या गुजरात विधानसभा निवडणूकीत उमेदवारी मिळाली आणि विजयावर आपले नाव कोरले.

रिवाबा जडेजांना उमेदवारी का देण्यात आली

रिवाबा जडेजा यांनी रवींद्र जडेजाशी लग्न केल्यानंतर खऱ्या अर्थाने राजकीय कुटूंबात एन्ट्री केली. कारण रवींद्र जडेजाचे वडिल अनिरुद्ध जडेजा आणि बहिण नैना जडेजा हे देखील राजकारणात आहेत. नैना जडेजा जामनगरमध्ये महिला काँग्रेसच्या अध्यक्षा आहेत.

रिवाबा आणि रवींद्र जडेजाची लव्हस्टोरी

रवींद्र जडेजाची बहिण नैना आणि रिवा या या खूप चांगल्या मैत्रीणी होत्या. एका पार्टीत नैना यांनी रवींद्र यांची रिवा यांच्यासोबत भेट घडवून आणली. यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर 2016 मध्ये त्यांनी लग्न केले. या दोघांना पाच वर्षाची मुलगी आहे.

या निवडणूकीदरम्यान दरम्यान या निवडणूकीत रविंद्र जडेजाने रिवाबा यांना खूप मदत केली त्यांच्या प्रत्येक निवडणूक रॅलीत ते सहभागी होते.

या प्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात पडल्या होत्या रिवाबा

2018 मध्ये जामनगर येथे रिवाबा यांनी त्यांच्या गाडीने बाइकस्वार कॉन्स्टेबलला धडक मारली. यानंतर या दोघांमध्ये वाद झाला. कॉन्स्टेबलवर आरोप होता की त्याने रिवाबा यांचे केस ओढले आणि त्यांना झापड मारली. होती. या प्रकरणाने रिवाबा चर्चेत आल्या होत्या त्यानंतर त्या कॉन्स्टेबलवर कारवाई करण्यात आली होती.

याशिवाय राजकोटच्या पोलिसांनी मास्क न घातल्यामुळे रिवाबा यांची गाडी थांबवली होती. त्यावेळी रवींद्र त्यांच्यासोबत होते. रवींद्रने मास्क घातला होता मात्र रिवाबा यांनी मास्क घातला नव्हता. पोलिसांनी जाब विचारताच त्यांनी पोलिसांसोबत वाद घातला. यामुळेही त्या चर्चेत आल्या होत्या

रिवाबा जडेजाची एकूण संपत्ती किती?

निवडणूक प्रतिज्ञापत्रात रिवाबा जडेजाने सांगितल्याप्रमाणे रिवाबाकडे 97 कोटींहून अधिक संपत्ती आहे. ज्यामध्ये सुमारे एक कोटी रुपयांचे दागिने आहेत तर इतर मालमत्तेत जमीन,प्लॉट आणि घर यांचाही समावेश आहे. 2021-22 मध्ये 18.56 कोटी रुपयांचे उत्पन्न दाखवले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK ची साथ सुटताच Deepak Chahar च्या बहीण अन् पत्नीची स्पेशल सोशल मीडिया पोस्ट; पाहा काय लिहिलंय

Mumbai Local Train: मुंबईमध्ये उद्यापासून १३ नवीन AC लोकल धावणार

FIDE World Championship: भारताच्या डी गुकेशचं पराभवानंतर दुसऱ्या फेरीत कमबॅक, लढत ड्रॉ राखण्यात यश

Manoj Jarange Patil: ''एकदा सरकार स्थापन होऊ द्या.. तुम्ही तयारीला लागा'' मनोज जरांगे यांचं मराठा समाजाला आवाहन

ZIM vs PAK: १४६ धावांचे लक्ष्य एकट्याने चोपल्या ११३ धावा! २२ वर्षीय पाकिस्तानी फलंदाजाची हवा

SCROLL FOR NEXT