देश

BJP AAP Deal: गुजरातसाठी भाजपकडून दिल्ली, हिमाचल कुर्बान? वाचा Inside Story

दिल्ली तुम्ही घ्या आणि गुजरात आम्हाला द्या भाजप आपची डील असल्याचा आरोप

धनश्री ओतारी

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काहीवेळापूर्वीच गुजरात विधानसभा निवडणुकीवर मोठं वक्तव्य केलं. दिल्ली तुम्ही घ्या आणि गुजरात आम्हाला द्या भाजप आपची डील असल्याचा आरोप राऊत यांनी केला. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात राऊतांनी केलेला आरोपामध्ये तथ्य असल्याचे बोलले जात आहेत यामागजे कारणदेखील तसेच आहे. ( Gujarat Election Results 2022 Analysis BJP AAP over vote deal himachal pradesh Delhi)

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरूवात झाली आहे. दोन टप्प्यांमध्ये मतदान पार पडलं आहे. सकाळपासूनचा निकाल पाहात भाजप आघाडीवर आहे. गुजरात विधानसभेच्या सर्व 182 जागांसाठीचे प्रारंभिक कल समोर आले आहेत. त्यानुसार भाजपने 150 जागांवर आघाडी कायम ठेवली आहे, तर काँग्रेस केवळ 19 जागांवर कमी पडताना दिसत आहे. त्याचवेळी आम आदमी पक्षाच्या गोटात नऊ जागा दिसत आहेत, तर अपक्षांनी चार जागांवर आघाडी कायम ठेवली आहे. गुजरातमध्ये भाजपच्या या बंपर वाढीमुळे अनेक तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. यातील सर्वाधिक चर्चा भाजपने गुजरातसाठी दिल्लीचा बळी दिला का? असा सवाल उपस्थित होत आहे.

भाजपची ईनसाईड स्टोरी

नुकतचं दिल्ली महापालिकेच्या निवडणुक पार पडली. या निवडणुकीत आपने दणदणीत विजय मिळवला. या निवडणुकीत आपने सर्वाधिक जागा मिळवत सत्ता काबीज केली आहे. आपने भाजपची गेल्या 15 वर्षाची सत्ता खेचून आणली. या निवडणुकीत भाजपला केवळ 104 जागांवर समाधान मानावं लागलं. तर आप 134 जागांवर बाजी मारली.

विशेष म्हणजे, दिल्ली महापालिका निवडणुकीतील भाजपची भूमिका पाहता एमसीडी निवडणुकीत भाजप पूर्ण ताकदीनिशी रिंगणात उतरला नाही. पीएम मोदींनी एमसीडीमध्ये कमळ फुलवण्यासाठी एकही सभा घेतली नाही. त्याचवेळी अमित शहा शेवटच्या क्षणी स्वतःच्या सभेला पोहोचले नाहीत. दिल्लीची जबाबदारी फक्त राजनाथ सिंह, गौतम गंभीर आणि इतर नेत्यांवर उरली होती.

मात्र, गुजरातमध्ये भाजपने आपला गड राखण्यासाठी चांगलीच कंबर कसली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 31 हून अधिक सभा घेतल्या आणि राज्यातील 134 विधानसभा जागा कव्हर केल्या. मात्र, अहमदाबादमधील 50 किलोमीटर लांबीचा रोड शो हे विशेष आकर्षण होते. त्याचवेळी गृहमंत्री अमित शहा 23 रॅलींद्वारे 108 जागा कव्हर करताना दिसले.

आपची माघारीची भूमिका?

आम आदमी पक्षाचा प्रमुख चेहरा असलेले अरविंद केजरीवाल हे सुरुवातीच्या टप्प्यात गुजरातमध्ये दिसले होते, मात्र दुसऱ्या टप्प्याच्या मतदानापूर्वी त्यांनी गुजरातमधून काढता पाय घेतला असेच म्हणावे लागेल. कारण त्यांनी दुसऱ्या टप्प्यादरम्यान, संपूर्ण लक्ष दिल्लीकडे वळवले होते. त्याचवेळी, केजरीवाल यांची भूमिका पाहूनही भाजपने दिल्लीकडे लक्ष न देता गुजरातवर लक्ष केंद्रित केले.

ही सर्व परिस्थिती पाहता राजकीय वर्तुळात महाराष्ट्र राज्याचे नेते राऊत यांनी केलेला आरोपामध्ये तथ्य असल्याचे बोलले जात आहे.

हिमाचल प्रदेश

हिमाचल प्रदेशात सध्या भाजपचे सरकार आहे. हिमाचलमध्ये 1985 नंतर दर पाच वर्षांनी सत्ता बदलते. काँग्रेसला आशा आहे की, परंपरेनुसार नता सत्तेच्या चाव्या त्यांच्याकडे सोपवेल. एक्झिट पोलबद्दल बोलायचे झाले तर त्यातही काँग्रेस मजबूत स्थितीत दिसून आली आहे. त्याचवेळी भाजपचा दावा आहे की, यावेळी ते प्रथा बदलून पुन्हा सरकार स्थापन करतील. येथे भाजपने 'राज नही भी, रिवाज बदलेंगे'चा नारा कायम ठेवला आहे.

पण सध्याची स्थिती पाहाता भाजपने हिमाचलमध्ये अधिक रस दाखवला नाही. पंतप्रधान मोदी यांनी केवळं ४ रॅली काढल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis : 'महाविकास आघाडीकडून व्होट जिहादचे काम; आता एक व्हावं लागेल'

Latest Maharashtra News Updates live : छत्तीसगढच्या कांकेरमध्ये ५ नक्सलवाद्यांचा खात्मा

Government Job : सरकारी नोकरी मिळवण्याचे सोपे मार्ग: भारतातील ९ सर्वात सोप्या सरकारी परीक्षा

Mahavikas Aghadi advertisement: महाविकास आघाडीच्या जाहिरातीवर ब्राम्हण समाजाचा तीव्र आक्षेप; बंदी आणण्याची मागणी

'बिग बॉस १८' मध्ये सलमानने घेतली अश्नीर ग्रोवरची शाळा; दोगलापन वाल्या डायलॉगवर भाईजान नाराज

SCROLL FOR NEXT