Dholavira city 
देश

युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळात 'ढोलविरा' शहराचा समावेश

सुमारे साडेचार हजार वर्षांपूर्वीच्या सिंधू संस्कृतीतील ही वसाहत आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : हडप्पाकालिन ढोलविरा शहराला युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळात स्थान मिळालं आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सांस्कृतीक विभागानं मंगळवारी ही घोषणा केली. हे शहर सध्याच्या गुजरात राज्यात असून त्याचे अवशेष या ठिकाणी पहायला मिळतात. सुमारे साडेचार हजार वर्षांपूर्वीची ही वसाहत आहे.

युनेस्कोनं आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन याची घोषणा केली. यामध्ये त्यांनी म्हटलं की, "ब्रेकिंग, ढोलविरा, भारतातील हडप्पाकालिन एक शहर युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांच्या यादीत समाविष्ट करण्यात आलं आहे. अभिनंदन!"

भारताची ४० शहरं जागतिक वारसा स्थळांच्या यादीत

युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीचं ४४ वं सत्र चीनच्या फुझहाऊ येथे पार पडलं. यामध्ये हे निश्चित करण्यात आलं की, भारतातील ककाटिया रुद्रेश्वरा (रामप्पा) मंदिर, तेलंगणा आणि गुजरातमधील हडप्पाकालिन ढोलविरा शहर यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळाच्या यादीत समावेश करण्यात यावा. दोन नवी शहरं समाविष्ट झाल्यानंतर भारताच्या जागतिक वारसास्थळांमध्ये समावेश झालेल्या शहरांची संख्या ४० झाली आहे.

पन्नास वर्षांपूर्वी ढोलविरा शहराचा लागला शोध

ढोलविरा हे शहर आर्चिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाला (ASI) सन १९६७-६८ मध्ये सापडलं होतं. सिंधू खोऱ्यातील संस्कृतीशी संबंधित असलेल्या भारतातील या पाच मोठ्या साईट्स आहेत. ही जगातील सर्वांत प्राचीन वसाहत किंवा संस्कृती म्हणून ओळखलं जातं. ख्रिस्तपूर्व २६५० मध्ये ही शहरं वसवली गेली तर ख्रिस्तपूर्व २१००मध्ये संथपणे या संस्कृतीच्या अधोगतीला सुरुवात झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Voilance : मुख्यमंत्री बिरेनसिंह यांचे पेटविले घर; मैतेई गटाकडून २४ तासांचा अल्टिमेटम

Kantara Chapter 1: तारीख ठरली! 'या' दिवशी जगभरात प्रदर्शित होणार 'कांतारा चॅप्टर १'; उरले किती दिवस?

Latest Maharashtra News Updates : पुण्यात सुप्रिया सुळे यांच्या बॅगांची तपासणी

Sharad Pawar यांच्यावर टीका का करत नाही? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'मी विचलित...'

Sovereign Gold Bond: सरकारी योजनेत गुंतवणूकदारांचे पैसे झाले दुप्पट

SCROLL FOR NEXT