गुजरात उच्च न्यायालयाने नुकतेच उत्तर प्रदेशात जन्मलेल्या एका पाणीपुरी विक्रेत्याच्या मुलाचा राखीव श्रेणीतील जागेवरील एमबीबीएसचा प्रवेश केला. कारण तो गुजरात राज्यातील सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय प्रवर्गात (SEBC) नसल्याचे न्यायालयाने मान्य केले.
सरन्यायाधीश सुनीता अग्रवाल आणि न्यायमूर्ती अनिरुद्ध पी माई यांच्या खंडपीठाने राठोड हे सर्वसाधारण प्रवर्गाच्या यादीतही प्रवेशासाठी पात्र असतील आणि त्यांना जातीवर आधारित आरक्षणाची आवश्यकता नसल्याने हा निकाल दिला. (Gujarat HC Cancels MBBS Admission of Pani Puri Vendor's Son)
तेली उपजाती गुजरातमध्ये सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग (SEBC) म्हणून ओळखली जात नाही, त्यामुळे अल्पेशकुमार रामसिंग राठोड याचा वैद्यकीय प्रवेश सप्टेंबर 2023 मध्ये रद्द करण्यात आला होता. या विद्यार्थ्याचे पालक मूळचे उत्तर प्रदेशचे होते, जेथे ही जात एसईबीसी मध्ये येते.
दोन महिन्यांपूर्वी एकल न्यायाधीशांनी विद्यार्थ्याची कौटुंबिक पार्श्वभूमी लक्षात घेऊन आणि त्याच्या कामगिरीबद्दल त्याचे कौतुक करून त्याला प्रवेश बहाल केला होता. त्यानंतर जवळपास दोन महिन्यांनंतर खंडपीठाने संबंधित विद्यार्थ्याचा प्रेवेश रद्द करण्याचा आदेश दिला.
एकल-न्यायाधीशांनी राठोडला सरकारी वैद्यकीय महाविद्यालय, वडोदरा येथे पुन्हा प्रवेश बहाल केला होता. परंतु विभागीय खंडपीठाने म्हटले आहे की, विद्यार्थ्याला प्रमाणपत्राच्या आधारावर प्रवेश मिळाला होता. पण ते प्रमाणपत्र गुजरातमध्ये जारी केले जाऊ शकत नाही.
“एकदा हे प्रमाणपत्र रद्द झाले की, तुमचा प्रवेश आपोआप रद्द होईल. अशा परिस्थितीत प्रवेश वाचवण्यासाठी सहानुभूती हे कारण नाही," असे न्यायालयाने म्हटले आहे.
या विद्यार्थ्याने आतापर्यंत 9 महिने शिक्षण घेतले आहे. त्याचा प्रवेश रद्द केल्यानंतर ही जागा रिकामीच राहाणार आहे. त्यामुळे प्रेश रद्द करू नये यावर विचार करण्यास न्यायालयाने नकार दिला.
न्यायालय म्हणाले, “अशा प्रकारची अपेक्षा कुणाकडून करू नये… हे तुमच्या कर्माचे फळ आहे. तू त्या जातीचा नाहीस हे तुला माहीत होतं, तुझ्या कुटुंबाला माहीत होतं.”
राठोड याचा जन्म उत्तर प्रदेशात झाला पण त्यांचे शालेय शिक्षण गुजरातमध्ये झाले. त्याचे वडील अरवली जिल्ह्यात पाणीपुरी विकतात.
तो 2022 मध्ये नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट (NEET-UG) मध्ये बसला आणि त्याने 720 पैकी 613 गुण मिळवले आणि 15,423 NEET ऑल इंडिया रँक मिळवला.
राठोड याला 2018 मध्ये जारी केलेल्या जात प्रमाणपत्राच्या आधारे एसईबीसी प्रवर्गांतर्गत एमबीबीएस प्रवेश देण्यात आला. मात्र, त्यांचे जात प्रमाणपत्र रद्द केल्यामुळे त्यांचा प्रवेश सप्टेंबर २०२३ मध्ये अधिकाऱ्यांनी रद्द केला होता. याला त्याने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.