Rahul Gandhi Defamation Case gujarat high court decision today BJP PM modi marathi political news  Esakal
देश

Rahul Gandhi Defamation Case: राहुल गांधी यांना मोठा धक्का! मानहानीच्या प्रकरणात राहुल गांधींना शिक्षा कायम

अंकिता खाणे (Ankita Khane)

राहुल गांधी यांना गुजरात हायकोर्टाचा दिलासा नाहीच. मोदी आडनावाशी संबंधित बदनामी प्रकरणात सुनावलेल्या शिक्षेविरुद्ध काँग्रेस नेते राहुल गांधी यांची याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. राहुल गांधी यांना सूरत न्यायालयानं दोषी ठरवून 23 मार्च रोजी दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. ती शिक्षा कायम असणार आहे.  (Marathi Tajya Batmya)

गुजरातचे भाजप नेत पुर्णेश मोदी यांनी निवडणूकीच्या प्रचारादरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी 'मोदी चोर है' या शब्दांचा वापर करत केलेल्या वक्तव्याविरोधात सुरत कोर्टात मानहानीचा खटला दाखल केला होता. या खटल्यात राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर त्यांची खासदारकी देखील गेली. दरम्यान आज या प्रकरणात मोठा निकाल समोर आला आहे. (Marathi Tajya Batmya)


गुजरात हायकोर्टानं राहुल गांधी यांची पुनर्विचार याचिका फेटाळली आहे. राहुल गांधींना कोर्टाकडून कोणाताही दिलासा देण्यात आलेला नाही. कोर्टाच्या या निर्णयामुळे राहुल गांधींची खासदारकी 8 वर्षांसाठी रद्द राहणार आहे. राहुल गांधीसांठी हा एक मोठा धक्का मानला जात आहे.

प्रकरण काय आहे?

सुरत कोर्टाने २३ मार्च रोजी दिलेल्या निर्णयानुसार या मानहाणीच्या खटल्यात राहुल गांधी यांना दोषी ठरवण्यात आले होते आणि त्यांना २ वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली. यामुळे राहुल गांधी यांना खासदारकी देखील गमवावी लागली. यानंतर सेशन कोर्टात पुन्हा अपील करण्यात आली होती, ती फेटळण्यात आली. (Marathi Tajya Batmya)

यानंतर राहुल गांधी यांच्याकडून गुजरात हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली. दरम्यान हायकोर्टाने २ मे रोजी आपला निर्णय राखून ठेवला होता. यानंतर आता निर्णय देण्यात आला आहे. राहुल गांधी यांनी दाखल केलेली याचिका कोर्टाने फेटाळली आहे.  (Marathi Tajya Batmya)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Eknath Shinde: महायुतीत एकनाथ शिंदेच वरचढ! कोकणात लढवणार सर्वाधिक जागा? भाजप, राष्ट्रवादीला फक्त 'इतक्या' जागा

Haryana Election : हरियानातील हॅट्रिकनंतर भाजपचं खास सेलिब्रेशन! राहुल गांधींना पाठवली खास भेट

Latest Maharashtra News Updates : विदर्भातील 11 जिल्ह्यांना आज पावसाचा इशारा, पश्चिम महाराष्ट्रात काय स्थिती?

Share Market Opening: शेअर बाजार हिरव्या रंगात उघडले; निफ्टी 25,000च्या वर, कच्च्या तेलात मोठी घसरण

Mumbai High Court: खड्डे बुजवण्यासाठी आतापर्यंत काय केले? महामुंबईतील पालिकांना न्यायालयाचा सवाल

SCROLL FOR NEXT