Gujarat Accident eSakal
देश

Gujarat Accident : अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या लोकांना भरधाव कारने चिरडलं; पोलीस कॉन्स्टेबलसह ९ जण जागीच ठार!

Sudesh

गुजरातच्या अहमदाबादमध्ये एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तब्बल ९ जणांचा मृत्यू झाला आहे. शहरातील सरखेज-गांधीनगर महामार्गावर गुरुवारी पहाटे १-१.३० च्या सुमारास हा अपघात झाला. आधीच झालेला एक अपघात पाहण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या लोकांना दुसऱ्या एका भरधाव कारने चिरडल्यामुळे ही दुर्घटना घडली. (Gujarat Accident)

मिळालेल्या माहितीनुसार, एसजी हायवेवर असणाऱ्या इस्कॉन फ्लायओव्हरवर एका ट्रक आणि थार गाडीचा अपघात झाला होता. यामध्ये थार गाडीला धडक देऊन ट्रक पसार झाला होता. या अपघातानंतर महामार्गावर मोठी गर्दी झाली होती. मदतकार्य करण्यासाठी आणि अपघात पाहण्यासाठी कित्येक लोक याठिकाणी उतरले होते.

त्यानंतर अचानक एक भरधाव जॅग्वार कार (Gujarat Jaguar Accident) आली, आणि थेट या गर्दीमध्ये शिरली. यामुळे कित्येक जण उडून लांब पडले. या अपघातामध्ये ९ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर सुमारे १० ते १२ जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. मृतांमध्ये एक पोलीस हवालदार आणि एका होमगार्ड जवानाचाही समावेश आहे.

वाहन चालकही जखमी

या अपघातात जॅग्वारचा चालक तथ्य पटेल देखील जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. प्रचंड वेगात असलेल्या जॅग्वार गाडीचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bharatvakya Book Publication : ‘भरतवाक्य’चे पंतप्रधानांच्या हस्ते प्रकाशन

Sharad Pawar Video : "८४ होवो, ९० होवो हे म्हातारं काही थांबत नाही"; शरद पवारांचा सत्ताधाऱ्यांना इशारा

कोअर कमिटीची 4 तास बैठक; भाजप उमेदवार कधी निश्चित करणार? मिटींगनंतर तारीख सांगितली, जाणून घ्या...

अतुल यांच्या निधनानंतर व्हायरल होतोय त्यांचा जगणं शिकवणारा व्हिडिओ; म्हणालेले- समोरच्यासाठी आपण काय आहोत...

IAS Promotion: राज्यातील 23 अपर जिल्हाधिकारी बनले 'आयएएस'; पुण्यातील 4 जणांचा समावेश

SCROLL FOR NEXT