Rajkot Gaming Zone Fire Gujarat Esakal
देश

Rajkot Fire: गेमिंग झोनमधील आगीतील मृतदेहांची राख, ओळख पटवण्याचे आव्हान; मृतांचा आकडा 28 वर

Gaming Zone Fire: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाळेला सुट्ट्या असल्याने मोठ्या संख्येने मुले आपल्या पालकांसोबत मजा करण्यासाठी टीआरपी गेम झोनमध्ये आली होती.

आशुतोष मसगौंडे

गुजरातमधील राजकोट शहरातील टीआरपी गेम झोनमध्ये लागलेल्या भीषण आगीत आतापर्यंत चार मुलांसह 28 जणांचा मृत्यू झाला आहे.

गृहराज्यमंत्री हर्ष संघवी यांनी रात्री उशिरा घटनास्थळी भेट देऊन अपघाताची माहिती घेतली. एक व्यक्ती बेपत्ता असल्याचे त्यांनी सांगितले.

राजकोट पोलिसांनी सांगितले की, अपघातानंतर 'गेम झोन'चा मालक आणि व्यवस्थापकाला ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी सरकारने विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे.

शनिवारी संध्याकाळी राजकोटच्या TRP 'गेम झोन' मध्ये लागलेल्या भीषण आगीत 12 वर्षाखालील चार मुलांसह एकूण 28 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

राजकोटच्या सहाय्यक पोलिस आयुक्त राधिका भराई यांनी सांगितले की, 28 मृत्यूंची पुष्टी झाली आहे. मृतदेह पूर्णपणे जळाले आहेत. अशा परिस्थितीत त्यांची ओळख पटवणे आव्हानात्मक ठरत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाळेला सुट्ट्या असल्याने मोठ्या संख्येने मुले आपल्या पालकांसोबत मजा करण्यासाठी टीआरपी गेम झोनमध्ये आली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, अर्ध्याहून अधिक मृतदेह ओळखण्यापलीकडे जळाले आहेत. अग्निशमन दलाचे पथक टीआरपी गेम झोनच्या जळालेल्या अवशेषांचा शोध घेत आहेत. दरम्यान, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात झाला तेव्हा नाना-मावा रोडवर असलेल्या टीआरपी गेम झोनमध्ये लहान मुलांसह अनेक लोक गेम खेळत होते.

दरम्यान गेम झोनला फायर एनओसी नसल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. एवढेच नाही तर गेम झोनमध्ये अग्निशमन उपकरणांचाही अभाव होता.

या घटनेची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिली. राज्य सरकारने मृतांच्या कुटुंबीयांना 4 लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Siddharth Shirole Shivajinagar Election 2024 Result: शिवाजीनगरात काँग्रेसला बंडखोरीचा फटका, सिद्धार्थ शिरोळे 36 हजार मतांनी विजयी

Assembly Election Result Viral Memes : महायुतीचा एकतर्फी विजय अन् महाविकास आघाडीचा सपशेल पराभव; सोशल मीडियावर आली Memes ची लाट

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: माळशिरसात सातपुते २०७५ मतांनी पिछाडीवर

Rajesh Kshirsagar Won Kolhapur North Assembly Election : 'कोल्हापूर उत्तर'मधून राजेश क्षीरसागर तब्बल 30 हजार मतांनी विजयी; लाटकरांचा केला पराभव

karmala Assembly Election 2024 Result Live: करमाळ्यात नारायण आबा पाटील यांचा विजय, संजयमामा शिंदे यांना धोबीपछाड, बागल गटाचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT