Modi_Patel_Setlwad_Gujrat riots 
देश

Gujarat riots: अहमद पटेलांसह इतरांनी रचला मोदींना अडकवण्याचा कट - SIT

अहमद पटेल, आर. बी. शिवकुमार, संजीव भट्ट यांच्या नावाचाही केला उल्लेख

सकाळ डिजिटल टीम

अहमदाबाद : सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड आणि काँग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल यांच्यासह इतरांनी गुजरात दंगलीत तत्कालीन मुख्यंमत्री नरेंद्र मोदी यांना अडकवण्याचा कट रचला, अशी माहिती विशेष तपास पथकानं (SIT) शुक्रवारी सेशन्स कोर्टाला सांगितलं. मोदींचं गुजरातमधील सरकार काहीही करुन पाडायचं यासाठी हे कारस्थान रचल्याचंही एसआयटीनं म्हटलं आहे. (Gujarat riots Tista Setalwad Ahmed Patel hatch a conspiracy to trap Modi SIT to court)

एसआयटीनं कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केलं यावेळी त्यांनी आरोपींच्या जामिनाला विरोध केला. जामिनाला विरोध करताना एसआयटी अधिकाऱ्यांनी कोर्टाला सांगितलं की, गुजरातची प्रतिमा खराब करण्यासाठी कट रचला गेला होता. यासाठी काँग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल यांचा सहभाग होता. ते तेव्हा राज्यसभा खासदार आणि काँग्रेस हायकमांड सोनिया गांधी यांचे राजकी सल्लागर होते.

एसआयटीच्या चौकशी समितीनं दावा केला की, गुजरातमधील निवडून आलेलं सरकार पाडणं हे सेटलवाड यांचं राजकीय ध्येय होतं. विरोधीपक्षाकडून त्यांना यासाठी अवैध मार्गानं ३० लाख रुपये मिळाले होते. विरोधी पक्षाकडून सेटलवाड यांना गुजरातमधील विविध अधिकारी आणि निरपराध लोकांना विविध प्रकरणांमध्ये अडकवणे आणि त्यांच्यावर खटले चालवण्याचं त्या काम करत होत्या. यामध्ये नरेंद्र मोदी देखील त्यांच्या टार्गेटवर होते. याप्रकरणी तिस्ता सेटलवाड, माजी आयपीएस अधिकारी आरबी श्रीकुमार आणि संजीव भट्ट यांना अटकही करण्यात आली होती.

एसआयटी भाजपच्या सांगण्यावरुन काम करत आहे - काँग्रेस

अशा प्रकारे एसआयटी काही लोकांच्या सांगण्यावरुन काम करत आहे. तसेच जे लोक सध्या हयात नाहीत त्यांच्यावर आरोप करुन त्यांचं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न करत आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसनं दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Updates : खेरवाडी उड्डाणपुलावर चालत्या कारने घेतला पेट

Jalgaon Jamod Assembly Election 2024 Result : जलंब मतदार संघाचा विक्रम मोडत जळगावने रचला नवा इतिहास

Phulambri Assembly Election 2024 Result : फुलंब्री विधानसभेत 25 जणांचे डिपॉझिट जप्त! मनसेसह 19 उमेदवारांना नोटा पेक्षाही कमी मतदान

CSK ची साथ सुटताच Deepak Chahar च्या बहीण अन् पत्नीची स्पेशल सोशल मीडिया पोस्ट; पाहा काय लिहिलंय

Mumbai Local Train: मुंबईमध्ये उद्यापासून १३ नवीन AC लोकल धावणार; गाड्यांची संख्या ९६ वरुन १०६

SCROLL FOR NEXT