गांधीनगर : आम आदमी पक्षाने गुजरातमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यामुळे आता दिल्ली, पंजाब आणि मध्यप्रदेशनंतर गुजरातमध्ये आप आपल्या विजयाचा नारळ फोडणार का याकडे लक्ष असणार आहे.
येत्या डिसेंबर महिन्यात गुजरातेतील विधानसभा निवडणुकांची घोषणा होऊ शकते. त्याचबरोबर फेब्रुवारी २०२३ मध्ये या निवडणुकांसाठी मतदान पार पडणार असल्याची माहिती आहे. या निवडणुकांसाठी 'आप'ने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यामुळे आता भाजपचा बालेकिल्ल्यात 'आप' सुरूंग लावणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
या उमेदवारांची नावे झाली जाहीर
उमेदवाराचे नाव - विधानसभा मतदारसंघ
भेमाभाई चौधरी - देवदार
जगमल वाला - सोमनाथ
अर्जुन राठवा - छोटा उदयपूर
सागर रबरी - बेचराजी
वष्राम सगाठिया - राजकोट ग्रामीण
राम धडूक - कामरेज
शिवलाल बरासिया - राजकोट दक्षिण
सुधीर वाघानी - गरियाधर
राजेंद्र सोळंकी - बार्डोली
ओमप्रकाश तिवारी - नारोडा
दरम्यान, काही दिवसांपूर्वी झालेल्या देशातील पाच विधान सभा निवडणुकांत आप पक्षाने पंजाबमध्ये विजय मिळवत सत्ता स्थापन केली आहे. भगवंत माण हे तेथील मुख्यमंत्री असून मध्यप्रदेशमध्ये नुकत्याच झालेल्या महानगर पालिका निवडणुकांत आपने एका महापालिका निवडणुकीत विजय मिळवला आहे. त्यामुळे आपच्या राजकीय कक्षा रूंदावत चालल्या आहेत. त्यानंतर गुजरात विधानसभेसाठी आपने मोर्चेबांधणी केली असून गुजरातमध्येही आप विजय मिळवणार का याकडे लक्ष लागलेले असेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.