Morbi Disaster, Morbi bridge collapse Esakal
देश

Morbi Disaster: लोकप्रियतेपायी धरणाची क्षमता वाढवल्याने गमावले होते हजारो जीव

सत्तरच्या दशकात गुजरातमधील मोरबी शहराला असाच जबरदस्त धक्का बसला होता....परवाच्या घटनेत मोरबीच्या मच्छू नदीवरचा ब्रिटिशकालिन झुलता पूल कोसळून सुमारे दीडशे जण मरण पावले आणि काही जुन्या आठवणी जाग्या झाल्या

अमित गोळवलकर

मोर्वी किंवा मोरबी....गुजरातच्या राजकोट जिल्ह्यातले ऐतिहासिक शहर...या शहराला पूर्वी सौराष्ट्राचं पॅरिस म्हटलं जायचं. इथल्या मच्छू नदीच्या काठावरचा राजवाडा, परवाच पडलेला झुलता पूल. संस्थानकालीन नक्षीदार वेशी यांनी मोर्वी सजलं होतं....

सत्तरच्या दशकात या शहराला असाच जबरदस्त धक्का बसला होता....परवाच्या घटनेत मोरबीच्या मच्छू नदीवरचा (Morbi Bridge Tragedy) ब्रिटिशकालिन झुलता पूल कोसळून सुमारे दीडशे जण मरण पावले आणि काही जुन्या आठवणी जाग्या झाल्या. १९७० च्या दशकात हा पूल एका पडला होता आणि त्याला कारण होती १९७९ साली घडलेली एक महाभयानक घटना. (Gujrat Rajkot Morbi Village Dam Tragedy)

मोरबी धरण दुर्घटना

११ आॅगस्ट १९७९ चा दिवस. गुजरातमध्ये पंधरा दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु होता. १२ आॅगस्ट्या आदल्या चोवीस तासांत सुमारे २३ इंच पाऊस पडला. मोर्वी शहराच्या मध्यातून वाहते मच्छू नदी. नदी आणि शहर हे समपातळीवर. त्या आधी केव्हाच असा पाऊस पडला नव्हता.

मच्छू नदीच्या (Macchu River Morbi) वरच्या अंगाला मच्छू १ आणि मच्छू २ अशी दोन धरणं होती. मच्छू २ हे धरण १९७२ मध्ये बांधलं गेलं होतं. मोरबीपासून सहा किलोमीटर अंतरावर असणारं हे धरण मातीचं. त्या आठवड्यात झालेल्या महाभयंकर पावसामुळं मच्छू १ च्या धरणाच्या भिंतीवरुन सुमारे दहा फूट अंतरावरून पाणी वाहू लागलं. हे पाणी मच्छू दोनच्या धरणक्षेत्रात शिरलं आणि हाहाःकार उडाला.

मोरबी धरण दुर्घटना

हा पाऊस पाहून धरणाच्या डेप्युटी इंजिनिअरनं सकाळी ११ च्या सुमारास काही गावांना इशारा दिला होता. पण पाणी कमी होत नव्हतं. अखेर दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास पाण्याचा जादा ताण पडून मच्छू २ चा डावीकडचा ७६९४ फूट आणि उजवीकडचा ४५९९ फूट मातीचा बंधारा वाहून गेला. काही वेळातच फुटलेल्या धरणाचं पाणी मोरबी, मलिया ही शहरं आणि आसपासच्या एकूण सुमारे ८० हजारांची लोकवस्ती असलेल्या गावांमध्ये शिरलं....एकट्या मोरबी शहरात त्या दिवशी शिरलेल्या पाण्याची उंची साडेचार मीटर होती.

या धरणाला वीस दरवाजे होते. त्यापैकी १८ दरवाजे उघडले होते असं नंतर सांगण्यात आलं. पण त्याबद्दलशी शंका होती. मच्छू १ आणि मच्छू २ ही धरणं पाण्यानं भरली आहेत हे माहित असूनही खालील गावांना इशारा देण्याचं काम झालं नव्हतं. पावसामुळं फोन लाईन्स बंद असल्यानं मोर्वीच्या डीवायएसपींनाही धरणावरुन संपर्क होऊ शकला नव्हता.

मोरबी धरण दुर्घटना

एकूण मच्छू धरणाच्या बांधकामापासूनच प्रशासकीय गोंधळ होता. वास्तविक एक लाख क्युसेक्स एवढ्या क्षमतेचं धरण (Dam) बांधावं अशी सूचना सेंट्रल वाॅटर अँड पाॅवर कमिशननं केली होती. मात्र लोकप्रियता मिळवण्याच्या नादात तत्कालिन सरकारनं ही क्षमता दुपटीनं वाढवली. याचा परिणाम काय तर १२ आॅगस्ट १९७९ रोजीच्या त्या महाप्रलयात झालेले हजारो जणांचे मृत्यू. या महापुरात नक्की किती जणांनी प्राण गमावले याचा अंदाज बांधणंच कठीण होतं. त्यामुळे मृतांचा खरा आकडा कळू शकला नाही ही वस्तुस्थिती आहे.

दैनिक सकाळनं त्यानंतरच्या एका वृत्तात एक हजारांहून अधिक मृतदेह सापडल्याचं नोंदवलं होतं. गुजरात सरकार आणि विरोधी पक्ष १५ हजारांहून अधिक जण मरण पावल्याचं सांगत होते. आकडा काहीही असला तरी मोठ्या प्रमाणावर मनुष्यहानी झाली होती हे नक्की. या दुर्घटनेत जेआरडी टाटांसारखे उद्योगपती, अन्य राज्ये यांनी आर्थिक मदत केली....मदत कार्यात लष्कराचा अर्थातच मोठा वाटा होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं मृतदेह शोधून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याचं मोठं काम पार पाडलं होतं.

मोरबी धरण दुर्घटना
मोरबी धरण दुर्घटना

दैनिक सकाळनं या दुर्दैवी घटनेचं वार्तांकन करण्यासाठी एक बातमीदारही तिथं पाठवला होता...एवढ्यावरच न थांबता रिलिफ फंडाच्या माध्यमातून मोरबीच्या पुनर्वसनासाठी मोठा निधीही उभारला होता आणि त्या निधीतून मोरबीला मदत केली होती.

दोन दिवसांपूर्वी झुलता पूल कोसळून जी दुर्दैवी घटना घडली. त्या घटनेनंतर मोरबीतल्या जेष्ठांच्या मनातल्या १२ आॅगस्ट १९७९ च्या दुर्दैवी आठवणी निश्चितच जाग्या झाल्या असतील.

Edited By - Amit Golwalkar

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election 2024: महायुतीत तणाव? एकाच मतदारसंघात अजित पवार अन् एकनाथ शिंदेंचा उमेदवार आमने-सामने, आता प्रचार कुणाचा करणार?

Satara Elections : पाटणला 'मविआ'मध्ये बंडखोरी! 89 जणांची माघार, 109 जण रिंगणात; फलटण, वाईत दोन्ही राष्ट्रवादीतच लढत

X Block Feature : हे काय नवीन! ब्लॉक केलेल्या X अकाउंट्सवरून पाहता येणार शेअर केलेले पोस्ट अन् फॉलोवर्स,काय आहे नवं फीचर?

Latest Marathi News Updates live : बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी पुण्यातून आणखीन एक पिस्तूल जप्त

तुमचं लग्न का तुटलं? घटस्फोटाबद्दल पहिल्यांदाच बोलली दीप्ती देवी; म्हणाली- जेव्हा एकमेकांना समजून...

SCROLL FOR NEXT