Health Update: समाजवादी पार्टीचे नेते आणि माजी सुरक्षा मंत्री मुलायम सिंग यादव यांची प्रकृती नाजुक असल्याचे कळतेय. गेल्या काही दिवसांपासून गुरूग्रामच्या मेदांता रूग्णालयात त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलंय. विशेष डॉक्टरांच्या देखभालीत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मुलायम सिंग यांच्या भेटीला अखिलेश यादव मेदांता रूग्णालयात पोहोचले. यावेळी रामगोपाल यादवही उपस्थित होते अशी माहिती रूग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी दिली. मुलायम सिंग यांची प्रकृती फार नाजुक असून औषधोपचार सुरू असल्याचे सांगण्यात येतंय.
सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुलायम सिंग यांच्या किडनीवरील इन्फेक्श वाढले असल्याने त्यांच्या शरीरातील क्रिएटनिन लेवल अनेकदा अनियंत्रित होतेय. त्यामुळे त्यांना सीआरआरटी थेरपी देण्यात येतेय. ही थेरपी किडनी खराब झाल्यावर सामान्य डायलिसिसच्या तुलनेत जास्त महत्वपूर्ण ठरते.
दरम्यान मुलायम सिंग यादव यांच्या कुटुंबाने मुलायम सिंग यांची प्रकृती बरी असून त्यांना भेटण्यास रूग्णालयात गर्दी न करण्याचे आव्हाहन जनतेला केले होते. यादव यांना भेटण्यासाठी कार्यकर्ते आणि नेत्यांची वाढती गर्दी बघता त्यांची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.