Gyanvapi History: वाराणसी न्यायालयाचे जिल्हा न्यायाधीश अजय कृष्ण विश्वेश यांनी हिंदू पक्षाला ज्ञानवापीच्या व्यासजींच्या तळघरात नियमित पूजा करण्याची परवानगी दिली आहे. यापूर्वी कायदेशीर लढाई दरम्यान एएसआयच्या सर्वेक्षण अहवालातूनही ज्ञानवापीचे सत्य समोर आले होते.
ज्ञानवापीचं सध्याचं स्ट्रक्चर औरंगजेबाने बनवलं होतं. त्यापूर्वी १६६९ मध्ये त्याठिकाणी आदिविशेव्श्रराचे मंदिर तोडण्याचा आदेश औरंगजेबानं दिला होता. औरंगजेबापूर्वी अनेक मुस्लिम शासकांनी ते स्थान नष्ट केले. बीएचयूच्या (Banaras Hindu University) इतिहासकाराने संपूर्ण सत्य सांगितले आहे. (varanasi News in Marathi)
बनारस हिंदू विद्यापीठातील इतिहास विभागाचे प्राध्यापक प्रवेश भाद्वाज यांनी न्यूज १८ हींदीला दिलेल्या माहितीत अनेक दावे केले आहेत. एएसआयने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षण अहवालात शिवपुराण आणि लिंग पुराणात नमूद केलेल्या गोष्टींचा उल्लेख केला आहे. या दोन्ही पुराणात त्या स्थानाचे वर्णन अविमुक्तेश्वर क्षेत्र असे केले आहे. ११ व्या शतकात शम्स उद-दीन-इल्तुत्मिश यांनी प्रथम हे पाडले होते. त्यानंतर रझिया सुलताननेही त्याठिकाणी विध्वंस केला आणि हिंदू मंदिर नष्ट केले.
१५व्या शतकात सिकंदर लोदीनेही हल्ला करून या जागेची नासधूस केली होती. मात्र, त्यानंतर अकबराच्या कारकिर्दीत त्याची पुनर्बांधणी करण्यात आली. राजा मानसिंग यांनी त्याठिकाणी मंदिर बांधले.
त्यानंतर सुमारे १०० वर्षांनंतर औरंगजेबाच्या आदेशानुसार १६६९ मध्ये हे मंदिर पाडण्यात आले. त्यानंतर त्या ठिकाणी मशीद बांधण्यात आली. साकी मुस्तैद खान या पुस्तकात औरंगजेबाने मंदिर पाडून त्या ठिकाणी मशीद बांधल्याचा उल्लेख आहे. एएसआयच्या अहवालातही हे सत्य समोर आले आहे.
८ एप्रिल १६६९ रोजी औरंगजेबाने हा हुकूम जारी केला होता की सुभेदारांनी मंदिरे आणि शाळा नष्ट कराव्यात आणि मूर्तीपूजकांचे धर्मग्रंथही नष्ट करावेत. या हुकुमानंतर सप्टेंबर १६६९ मध्ये त्यांना बातमी मिळाली की या हुकुमानुसार काशीमध्ये असलेले काशी विश्वनाथ मंदिर (अविमुक्तेश्वर मंदिर) पाडून तेथे मशीद बांधण्यात आली, असे प्राध्यापक प्रवेश भारद्वाज यांनी म्हटले आहे. (Latest Marathi News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.