gyanvapi masjid asi survey permission granted esakal
देश

ज्ञानवापी मशीद परिसरात ASI सर्व्हेक्षण होणार; कोर्टाची परवानगी, मुस्लिम पक्षाने केला होता विरोध

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली: वाराणसी कोर्टाने ज्ञानवापी मशीद परिसरात एएसआय सर्व्हे करण्याची परवानगी दिलेली आहे. कोर्टाने वादग्रस्त भाग सोडून पूर्ण परिसराचा सर्वे करण्यास मान्यता दिली.

मुस्लिम पक्षाने या सर्व्हेचा विरोध केला होता. न्यायालयाने सर्व युक्तिवाद ऐकून घेऊन सर्व्हेक्षणाला परवानगी दिलेली आहे. वाराणसीचे जिल्हा न्यायाधीश अजय कृष्ण विश्वेश यांच्या कोर्टाने या प्रकरणी आज आदेश दिले आहेत.

१४ जुलै रोजी वाराणसीतल्या श्रृंगार गौरी ज्ञानवापी प्रकरणी मशिदीचं सर्व्हेक्षण करण्यासंबंधी सुनावणी झालेली होती. तेव्हा जिल्हा कोर्टाने निकाल राखीव ठेवला होता.

१६ मे २०२३ रोजी याचिकाकर्त्या चार महिलांच्या वतीने एक अर्ज दाखल करण्यात आलेला होता. ज्यामध्ये ज्ञानवापी मशिदीचा वादग्रस्त भाग वगळता संपूर्ण परिसराची एएसआय मार्फत चौकशी करण्याची मागणी करण्यात आलेली होती. या याचिकेवर न्यायालयाने निकाल दिला असून सर्व्हेला परवानगी दिलेली आहे.

वाद काय आहे?

ज्ञानवापी मशिदीचा आताच वाद का निर्माण झाला ? वादावरुन देशातील राजकारण चांगलेच पेटले आहे. वाराणसी येथील काशी विश्वनाथ मंदिराजवळ ही मशीद आहे. सध्या त्यावरुन कायदेशीर लढाई सुरु आहे. वाराणसीतील न्यायालयाने भारतीय पुरातत्त्व विभागाला मशिदीच्या ढाच्याची चौकशी करण्यास सांगितले आहे.

अनेक याचिका सर्वोच्च न्यायालय, अलाहबाद उच्च न्यायालय आणि वाराणसी न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. मोगल सम्राट औरंगजेब याने काशिनाथ मंदिर १६ व्या शतकात पाडून मशिद बांधल्याचा दावा याचिकार्त्यांनी याचिकेत केला आहे.

१९९१ मध्ये वाराणसी न्यायालयात याचिकाकर्ते, स्थानिक पुजारी यांनी याचिक दाखल करुन मशिदीतील भागात पूजा करण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी करण्यात केली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explained: डोनाल्ड ट्रम्प जिंकले तर शेअर बाजार कोसळणार; कमला हॅरिस अध्यक्ष झाल्यास काय होईल?

Pandharpur Vidhansabha: पंढरपूरात महाविकास आघाडीचा उमेदवार कोण ?

Latest Marathi News Updates live : अजित पवार गटातील कार्याध्यक्ष, जनरल सेक्रेटरींची शरद पवारांच्या पक्षात घरवापसी

Fact Check :'गंभीरकडून काही होणार नाही, मला कमबॅक करावं लागेल'; MS Dhoniचा Video Viral, चाहते सैराट

Mobile Addiction : दिवाळीच्या सुट्टीत पालकांना ब्लॉक करून मुले रिल्स, गेम्सच्या आहारी....सोशल मीडियावर नको ते उद्योग

SCROLL FOR NEXT