Gyanvapi Masjid Survey esakal
देश

Gyanvapi Masjid Case: अलाहाबाद हायकोर्टानं ASI सर्व्हेची स्थगिती वाढवली; उद्या होणार सुनावणी

मशीद परिसरात सर्व्हेक्षण थांबवण्यात आलं आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

Gyanvapi Msjid Case: ग्यानवापी मशीद प्रकरणात नवी अपडेट आली असून भारतीय पुरातत्व सर्व्हेक्षण खात्याकडून वाराणसीतील या मशीद परिसराच्या सर्व्हेला उद्यापर्यंत स्थगिती दिली आहे. मुख्य न्यायाधीश प्रितींकर दिवाकर यांनी याची सुनावणी उद्या, गुरुवारी २७ जुलै रोजी दुपारी ३.३० वाजता पुन्हा सुनावणी होणार असल्याचं सांगितलं. (Gyanvapi Msjid Case Allahabad High Court Stays again for ASI Survey hearing will be held tomorrow)

मशिदीचे व्यवस्थापन करणाऱ्या अंजुमन इंतेजामिया मशिदीच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी झाली. या संघटनेनं मशिदीच्या परिसराचे (वुजुखाना वगळता) ASI सर्वेक्षण करण्याची परवानगी देण्याच्या वाराणसी जिल्हा न्यायालयाच्या आदेशाला आव्हान दिलं होतं.

सुप्रीम कोर्टानं 26 जुलैपर्यंत एएसआय सर्वेक्षण थांबवल्यानंतर मशीद समितीनं हायकोर्टात धाव घेतली त्यानंतर हायकोर्टानं त्यांना कनिष्ठ कोर्टाच्या आदेशाविरुद्ध अपील करण्याची मुदत दिली.

त्यानुसार आज झालेल्या सुनावणीदरम्यान, मुख्य न्यायमूर्तींनी सर्व्हेक्षणासाठी हजर असलेल्या ASGI यांना मशिदीच्या प्रस्तावित सर्वेक्षणाची रचना आणि तपशील स्पष्ट करणाऱ्या प्रतिज्ञापत्रासह वाराणसीहून एका ASI अधिकाऱ्याला कोर्टात हजर राहण्याचे निर्देश दिले.

ASI च्या अधिकाऱ्यानं काय सांगितलं?

ASIच्या अधिकाऱ्यानं हायकोर्टात सांगितलं की, या सर्व्हेक्षणासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. यामध्ये मशीदीच्या रचनेला कुठलाही धोका निर्माण होणार नाही. आत्तापर्यंत इथला केवळ ५ टक्के सर्व्हे पूर्ण झाला असून ASIकडून उर्वरित सर्व्हेक्षणाचं काम ३१ जुलैपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.

मशीद समितीचा दावा काय?

पण मशीद समितीनं कोर्टात आरोप केला की अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळं मशीदीचं नुकसान होणार आहे. त्यामुळं या समितीची बाजू मांडणारे वरिष्ठ वकील एसएफआय नक्वी यांनी हायकोर्टाला विनंती केली की, वाराणसी कोर्टानं २१ जुलैचा आदेश घाईगडबडीत दिला आहे त्यामुळं हा आदेश रद्द करण्यात यावा. त्याचबरोबर यामध्ये मशीद समितीला पुरावे सादर करण्याबाबत विचारणा न करताच प्राथमिक स्तरावरच या सर्व्हेक्षणाचे आदेश देण्यात आले आहेत.

हिंदू पक्षकारांचं म्हणणं काय?

यावेळी अॅड. विष्णू जैन यांनी हिंदू पक्षकारांची बाजू मांडताना सोमवारी सॉलिसिटर जनरल यांनी स्पष्ट केलं आहे की, अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळं मशिदीला कुठलंही नुकसान होणार नाही. यावेळी त्यांनी राम मंदिराचाही दाखल देत तिथंही ASI सर्व्हेक्षण झालं असून त्याचा अहवालही हायकोर्टानं स्विकारल्याचं सांगितलं.

ग्यानवापी मशिदीचा वाद काय?

ग्यानवापी मशीद ही वाराणसीत काशी विश्वनाथ मंदिराच्या पुढेच स्थित आहे. हिंदू पक्षकारांनी याबाबत वाराणसी जिल्हा कार्टात धाव घेत या परिसराचं भारतीय पुरातत्व सर्व्हेक्षण खात्याकडून सर्व्हेक्षण करण्यात यावं.

या मशीदीच्या जागी पूर्वीच्या काळी मंदिर अस्तित्वात होतं की नाही याची पडताळणी करावी अशी मागणी केली आहे. यावर गेल्या आठवड्यात वाराणसी कोर्टानं सर्व्हेक्षणाची परवानगी दिली.

पण या कोर्टाच्या आदेशाला सुप्रीम कोर्टानं सोमवारी स्थगिती दिली. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशांनंतर सर्व्हेक्षणासाठी मशीद परिसरात सर्व्हेक्षण करत असलेल्या अधिकाऱ्यांनी आपलं काम थांबवलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

Ghatkopar East Assembly Election 2024 Result live : घाटकोपर पूर्व मतदार संघात भाजप आणि शरद पवार गटात दुहेरी लढत

Mira Bhaindar: Assembly Election 2024 Result Live: मिरा-भाईंदर मतदारसंघात सय्यद मुजफ्फर हुसेन विरुद्ध नरेंद्र मेहता

SCROLL FOR NEXT