कर्नाटकमधील सेक्स स्कँडल प्रकरण उघड झाल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाल्याचे पाहायला मिळाले होते. प्रज्ज्वल रेवण्णा यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप झाले आणि यानंतर रेवण्णा यांनी भारतातून पळ काढल्याचे समोर आले. दरम्यान कर्नाटकच्या हासन लोकसभा सीटवरून जेडीएसचे खासदार असलेले प्रज्वल रेवण्णा अजून फारार आहेत. यानंतर यासंदर्भात माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांनी नातू प्रज्वल रेवण्णा यांना लवकरात लवकर भारतात परतण्याचा इशारा दिला आहे. माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर यासंबंधी पोस्ट लिहीली आहे.
मी प्रज्वल रेवण्णा याला इशारा देतोय की त्याने ताबडतोब तो जेथे कोठे आहे तेथून तात्काळ परत (भारतात) यावे आणि कायदेशीर प्रक्रियेत सामील हाव्हे. त्यांने यापुढे माझ्या संयमाची परीक्षा घेऊ नये असे एचडी देवेगौडा म्हणाले आहेत. तसेच त्यांनी आपल्यावरील आरोप देखील खरे सिद्ध झाल्यास त्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, असे म्हटले आहे.
माजी पंतप्रधानांनी प्रज्वल रेवण्णा यांना माय वॉर्निंग नावाचे दोन पानी चेतावणी देणारे पत्र लिहिले. त्या पत्रात त्यांनी लिहिले की, गेल्या काही आठवड्यांत लोकांनी माझ्या आणि माझ्या कुटुंबाविरोधात कठोर शब्दात टीका केली आहे. प्रज्वलच्या कामांबद्दल मला काहीही माहिती नाही हे मी लोकांना समजावूनही सांगू शकत नाही. मी त्यांना समजावूनही सांगू शकत नाही की मी त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत नाहीये. मला त्याच्या परदेश दौऱ्याबद्दल काहीच माहीत नव्हते. माझा स्वतःच्या विवेकावर विश्वास आहे. मी देवावर विश्वास ठेवतो आणि मला माहित आहे की देवाला सर्व सत्य माहित आहे, असेही त्यांनी म्हटलं आहे.
महिनाभरापूर्वी देश सोडून पळून गेलेल्या प्रज्वल रेवण्णाला इशारा देताना एचडी देवेगौडा म्हणाले की, प्रज्वलला त्याच्या आजोबांबद्दल थोडा जरी आदर असेल तर त्याने परत यावे. त्यांनी पुढे लिहिले की, मी फक्त एकच गोष्ट करू शकतो. मी प्रज्वलला कडक ताकीद देऊ शकतो. तो कुठेही असला तरी, मी त्याला परत येण्यास सांगू शकतो आणि पोलिसांसमोर आत्मसमर्पण करायला सांगू शकतो. ही काही विनंती नाहीये, हा एक इशारा आहे.
देवेगौडा यांनी प्रज्वलला असेही सांगितले की जर त्याने कुटुंबातील सदस्यांचे आदेश पाळले नाहीत तर आपण त्याला कुटुंबापासून पूर्णपणे विभक्त करू. त्यांनी लिहिले की, प्रज्वलने या इशाऱ्याकडे लक्ष दिले नाही तर त्याला माझ्या आणि कुटुंबातील सर्व सदस्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.