नवी दिल्ली : माजी उपराष्ट्रपती हमीद अंसारी यांनी शुक्रवारी एक महत्त्वपूर्ण वक्तव्य केलं आहे. आज देश अशा 'प्रकट आणि अप्रकट' विचारांनी तसेच विचारधारांनी धोक्यात दिसत आहे जो देशाला 'आपण आणि ते' अशा काल्पनिक वर्गावारीच्या आधारे तोडण्याचा प्रयत्न करत आहे. अंसारी यांनी पुढे म्हटलं की कोरोना व्हायरसच्या संकटामध्ये आधीच भारतीय समाज दोन आणखी महामारींशी लढत आहे. एक म्हणजे धार्मिक कट्टरता आणि दुसरं म्हणजे आक्रमक राष्ट्रवाद. या दोन्हींना तो बळी पडला आहे. मात्र, या दोन्हींच्या तुलनेत देशप्रेम ही अधिक सकारात्मक संकल्पना आहे. कारण ही सैन्य आणि सांस्कृतिक रुपाने संरक्षणात्मक बाब आहे. ते काँग्रेसचे जेष्ठ नेते शशी थरुर यांचे नवे पुस्तक 'द बॅटल ऑफ बिलॉन्गिंग'च्या डिजीटल प्रकाशन सोहळ्याप्रसंगी बोलत होते.
हेही वाचा - Corona Update : गेल्या 24 तासांत 46,232 नवे रुग्ण; 564 जणांचा मृत्यू
त्यांच्या म्हणण्यानुसार, चार वर्षांच्या अल्पावधीतच भारताने एक उदार राष्ट्रवादाच्या दृष्टीकोनापासून सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या एक अशा राजकीय परिकल्पनेपर्यंतचा प्रवास केला आहे जो आता सार्वजनिक क्षेत्रात ठोसपणे रुजलेला आहे. माजी उप राष्ट्रपतींनी म्हटलं की, कोविड ही एक वाईट महामारी आहे मात्र याआधीच आपला समाज आणखी दोन महामारींनी ग्रस्त आहे. धार्मिक कट्टरता आणि आक्रमक राष्ट्रवादाला तो बळी पडला आहे. त्यांनी पुढे असं म्हटलं की, धार्मिक कट्टरता आणि उग्र राष्ट्रवादाच्या तुलनेत देशप्रेम ही जास्त सकारात्मक संकल्पना आहे.
हेही वाचा - आउट ऑफ टर्न प्रमोशन; दबंग कामगिरीनं कॉन्स्टेबल महिला बनली थेट इंस्पेक्टर
पुस्तक प्रकाशना दरम्यान चर्चेत भाग घेत जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुक अब्दुल्ला यांनी म्हटलं की, 1947 मध्ये आमच्याकडे पाकिस्तानसोबत जायची संधी होती. पण माझे वडिल आणि इतर लोकांनी असा विचार केला की द्विराष्ट्रवादाचा सिंद्धात आपल्यासाठी योग्य नाहीये. पुढे त्यांनी म्हटलं की, सध्याचे सरकार देशाला ज्या प्रकारे बघू इच्छित आहे त्याला ते कधीच स्विकारणार नाहीत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.