Sachin Pilot esakal
देश

काँग्रेसला नवा अध्यक्ष मिळणार? माजी प्रवक्त्याकडून 'या' नावाची शिफारस

सकाळ डिजिटल टीम

'काही नेते गांधी परिवाराला चुकीचे सल्ले देऊन भाजपसाठी काम करत आहेत.'

पाच राज्यांत काँग्रेसचा (Congress Party) झालेला पराभव हा पक्षाला चांगलाच जिव्हारी लागल्याचं दिसतंय. पंजाबसारखं राज्यही 'आप'नं काँग्रेसच्या हातून काढून घेतलं असून गोव्यातही अपेक्षित कामगिरी करता आली नाही. त्यामुळं आता काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी या पाच राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांचा राजीनामा मागितला होता. यात पंजाब प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंह सिध्दू (Navjot Singh Sidhu) यांचाही समावेश होता.

विधानसभा निवडणुकीतील दारूण पराभवानंतर काँग्रेसचं नेतृत्व आत्मपरीक्षणात व्यस्त असताना पक्षाचे काही ज्येष्ठ नेते नेतृत्व बदलाची मागणी सातत्यानं करत आहेत. कपिल सिब्बल (Kapil Sibal), संदीप दीक्षित यांच्यानंतर आता काँग्रेसचे माजी प्रवक्ते संजय झा (Sanjay Jha) यांनी राष्ट्रीय नेतृत्वावर प्रश्न उपस्थित केलेत. यासोबतच संजय यांनी सचिन पायलट (Sachin Pilot) यांना अध्यक्ष बनवण्याची मागणी केलीय.

एका वृत्तपत्राशी संवाद साधताना झा म्हणाले, राजस्थानमधील (Rajasthan) काही नेते गांधी परिवाराला चुकीचे सल्ले देऊन भाजपसाठी काम करत आहेत, त्यामुळं काँग्रेसचं मोठं नुकसान होत आहे. 1984 पासून काँग्रेसला कधीही पूर्ण बहुमत मिळालं नाही, हे सिद्ध झालंय. यामुळं पाच राज्यांतील दारुण पराभवाची संपूर्ण जबाबदारी नेतृत्वानं घ्यावी. यासोबतच पक्षातील अंतर्गत लोकशाही कमकुवत होत असल्याचंही झा म्हणाले.

या कठीण काळात काँग्रेसला विजयाची भूक असलेल्या नेत्याची गरज आहे. त्यामुळं सचिन पायलट यांना संधी दिली, तर ते नक्कीच काँग्रेसला विजय मिळवून देतील. पायलट अत्यंत कष्टाळू नेते आहेत, असंही ते म्हणाले. अशोक गेहलोत यांच्यावर हल्लाबोल करताना झा म्हणाले, जेव्हा गेहलोत यांनी राजस्थानमध्ये काँग्रेसला 21 जागांवर आणलं, तेव्हा सचिननं पाच वर्षे मेहनत करून पक्षाला 100 जागांवर नेलंय, त्यामुळं अशा नेत्याची काँग्रेसला खूप गरज असल्याचंही झा यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK ची साथ सुटताच Deepak Chahar च्या बहीण अन् पत्नीची स्पेशल सोशल मीडिया पोस्ट; पाहा काय लिहिलंय

Mumbai Local Train: मुंबईमध्ये उद्यापासून १३ नवीन AC लोकल धावणार; गाड्यांची संख्या ९६ वरुन १०६

FIDE World Championship: भारताच्या डी गुकेशचं पराभवानंतर दुसऱ्या फेरीत कमबॅक, लढत ड्रॉ राखण्यात यश

Manoj Jarange Patil: ''एकदा सरकार स्थापन होऊ द्या.. तुम्ही तयारीला लागा'' मनोज जरांगे यांचं मराठा समाजाला आवाहन

ZIM vs PAK: १४६ धावांचे लक्ष्य एकट्याने चोपल्या ११३ धावा! २२ वर्षीय पाकिस्तानी फलंदाजाची हवा

SCROLL FOR NEXT