कोलकाता : संदेशखाली हिंसाचार प्रकरणातील प्रमुख आरोपी शेख शहाजहाँ याला दुपारी साडे चार वाजता सीबीआयच्या ताब्यात सोपवा अशा कडक शब्दातं कलकत्ता हायकोर्टानं राज्य सरकारला निर्देश दिले आहेत. पश्चिम बंगालचे पोलीस या प्रकरणात लपाछपीचा खेळ खेळत असल्याची टिप्पणी देखील हायकोर्टानं केली आहे. (Handover of Sandeshkhali accused Shahjahan Sheikh to CBI says Calcutta High Court)
हायकोर्टानं नेमकं काय म्हटलं?
कलकत्ता हायकोर्टानं सुनावणीदरम्यान निरिक्षण नोंदवलं की, संदेशखाली प्रकरणातील प्रमुख आरोपी शेख शहाजहाँ याचा सरकारशी जवळचा संबंध असून त्याचा सरकार आणि पोलिसांतील अनेकांवर प्रभाव आहे. स्थानिक पोलीस या प्रकरणा लपाछपीचा खेळ खेळत आहेत, त्यामुळं या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडं हस्तांतरित करणं गरजेचं आहे. त्यामुळं सरकारनं आरोपीची कोठडी दुपारी सव्वा वाजता सीबीआयला द्यावी, असं कलकत्ता हायकोर्टानं म्हटलं आहे.
काय आहे संदेशखाली प्रकरण?
संदेशखाली इथल्या मागासवर्गीय महिलांच्या जमिनी त्यांना धमकावून लैंगिक अत्याचार करुन बळकावण्यात आल्या. गेल्या चार वर्षांपूर्वीपासून वारंवार हा प्रकार घडला आहे. इथल्या नागरिकांच्या रेशन कार्डमध्ये देखील गैरव्यवहार करण्यात आले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून गावातील नागरिकांना अनेक सुविधांपासून देखील वंचित ठेवल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळं संदेशखालीतील नागरिकांनी आंदोलन करत आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी पोलिसांकडे केली होती. (Latest Marathi News)
या महिलांनी पोलिसांत तक्रारी दिल्यानंतरही त्या मागे घेण्यासाठी या ग्रामस्थांना धमकल्याचा प्रकार इथं घडला आहे. तृणमूल काँग्रेसचा बाहुबली नेता शेख शहाजहाँ याच्याकडून हे कृत्य करण्यात आलं आहे.
प्रमुख आरोपीला अटक
दरम्यान, या घटनेतील प्रमुख आरोपी तृणमूल काँग्रेसचा बाहुबली नेता शेख शहाजहाँ याला पश्चिम बंगाल पोलिसांनी काही दिवसांपूर्वी अटक केली. २४ परगना जिल्ह्यातील मिनाखन परिसरातून त्याला ताब्यात घेण्यात आलं. ५५ दिवस फरार झाल्यानंतर त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. शहाजहां सध्या सीबीआयच्या ताब्यात असून सीबीआयनं त्याच्यावर तीन गुन्हे दाखल केले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.