युवा नेते हार्दिक पटेल (Hardik Patel) यांनी काँग्रेसचा हात नुकताच सोडला. यामुळे हार्दिक लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. यावर अनेक तर्कवितर्क लावले जात आहे. अशात त्यांनी मी माझ्या राजकीय आयुष्यातील तीन वर्षे काँग्रेसमध्ये वाया घालवली. मी काँग्रेसमध्ये नसतो तर गुजरातसाठी अधिक चांगले काम करू शकलो असतो. पक्षात असताना मला ना कधी काम करण्याची संधी मिळाली ना काँग्रेसने काम दिले, असे हार्दिक पटेल काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले. (Hardik Patel said, Congress never gave a chance to work)
काँग्रेसला (Congress) रामराम ठोकल्यानंतर हार्दिक पटेल पहिल्यांदाच माध्यमांसमोर आले. मी माझ्या आयुष्यातील तीन वर्षे काँग्रेसमध्ये वाया घालवली. सध्या तरी भाजपमध्ये किंवा आपमध्ये जाण्याचा निर्णय घेतलेला नाही. मी गुजरात काँग्रेसचा कार्यकारी अध्यक्ष होतो. परंतु, मला कोणतीही जबाबदारी दिली नाही. माझा केवळ वापर करून घेतला, असे हार्दिक पटेल (Hardik Patel) यांनी सांगितले.
काँग्रेस पक्ष हा केवळ लोकांचा वापर करून घेतो. कोणाकडूनही काम काढून घेतल्यानंतर त्यांना बाजूला केले जाते. हे केवळ माझ्यासोबतच झाले नाही तर नरहरी अमीन व चिमनभाई पटेल यांच्यासोबतही झाले. राहुल गांधी गुजरातला (gujrat) आले तेव्हा येथील समस्यांवर काहीही बोलले नाही, असेही हार्दिक पटेल म्हणाले.
वरिष्ठ नेत्यांवर अनेक गंभीर आरोप
हार्दिक पटेल (Hardik Patel) यांनी पक्ष नेतृत्वावर नाराजी व्यक्त करीत बुधवारी गुजरातच्या काँग्रेस कार्यकारी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ते भाजपमध्ये जातील, अशी चर्चा सुरू झाली. सोनिया गांधी यांना पत्र लिहून त्यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांवर अनेक गंभीर आरोप केले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.