fFormer Solicitor General of India Harish Salve tied the knot for the third time  
देश

Harish Salve Marriage : सलमानला 'हिट अँड रन' केसमध्ये वाचवणारे वकील लग्नबंधनात; ६८व्या वर्षी केलं तिसरं लग्न!

रोहित कणसे

Harish Salve Marriage : देशाचे माजी सॉलिसिटर जनरल आणि प्रसिद्ध वकील हरीश साळवे यांनी वयाच्या ६८ व्या वर्षी तिसरे लग्न केले आहे. २०२० मध्ये साळवे यांनी दुसरे लग्न केले होते. हरीश साळवे हे केंद्र सरकारच्या नव्याने स्थापन झालेल्या वन नेशन-वन इलेक्शन समितीचे सदस्य देखील आहेत.

देशातील सर्वात महागडे वकील अशी ओळख असलेल्या हरीश साळवे यांनी नुकतेच ट्रिना यांच्यासोबत थाटामाटात लग्नगाठ बांधली. यापूर्वी, मीनाक्षी (पहिली पत्नी) आणि कॅरोलिन ब्रॉसार्ड (२०२०) यांच्याशी त्यांचे लग्न झाले होते. साळवे आणि मीनाक्षी यांचा ३८ वर्षांच्या लग्नानंतर जून २०२० मध्ये घटस्फोट झाला. त्यांना साक्षी आणि सानिया या दोन मुली आहेत.

लग्नाला अनेक दिग्गजांची उपस्थिती..

हरीश साळवे यांच्या लग्नाला नीता अंबानी, ललित मोदी यांच्यासह अनेक जवळचे मित्र आणि कुटुंबीय उपस्थित होते. सुप्रीम कोर्टात प्रॅक्टिस करणारे ६८ वर्षीय वकील साळवे यांनी कुलभूषण जाधव यांच्यासह अनेक हाय-प्रोफाइल केसेस हाताळल्या आहेत.

कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने हेरगिरीच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा सुनावली होती. यावेळी जाधव यांच्या बाजूने खटला लढण्यासाठी साळवे यांनी फी म्हणून अवघा १ रुपया आकारला आणि यामुळे त्यांची खूप प्रशंसा झाली होती.

इतकेच नाही तर टाटा ग्रुप, मुकेश अंबानी यांचा रिलायन्स इंडस्ट्रीज आणि आयटीसी ग्रुप हे त्यांचे काही प्रमुख ग्राहक आहेत. तसेच अनिल अंबानींच्या रिलायन्स नॅचरल रिसोर्सेस लिमिटेड विरुद्ध कृष्णा गोदावरी बेसिन गॅस वाद प्रकरणातही त्यांनी बाजू मांडली होती.

इतकेच नाही तर, हरीश साळवे यांनी २००२ च्या हिट-अँड-रन प्रकरणात सलमान खानची केस देखील लढली होती. सलमानला पाच वर्षांची शिक्षा झाली होती. यानंतर १० डिसेंबर २०१५ रोजी, सलमानला २००२ च्या हिट-अँड-रन आणि ड्रंक-अँड-ड्राइव्ह प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालानंतर सर्व आरोपांमधून निर्दोष मुक्त करण्यात आले.

हरीश साळवे यांनी नोव्हेंबर १९९९ ते नोव्हेंबर २००२ पर्यंत भारताचे सॉलिसिटर जनरल म्हणून काम केले. तसेच साळवे यांनी वेल्स आणि इंग्लंडच्या न्यायालयांमध्ये राणीचे वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली. देशातील सर्वात प्रसिद्ध वकिलांपैकी एक असलेल्या साळवे यांनी नागपूर विद्यापीठातून एलएलबीचे शिक्षण घेतले आहे. भारताचे सॉलिसिटर जनरल म्हणून नियुक्ती होण्यापूर्वी त्यांची १९९२ मध्ये दिल्ली उच्च न्यायालयात ज्येष्ठ वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT