Harvard Study of Nachani Revolution in Jharkhand story of Naxal-hit Gumla district  sakal
देश

Nachani : झारखंडमधील नाचणीच्या क्रांतीचा ‘हार्वर्ड’मध्ये अभ्यास

सकाळ वृत्तसेवा

रांची : एकेकाळी कमालीचे दारिद्र्य आणि नक्षलवादासाठी ओळखणाऱ्या जाणाऱ्या झारखंडमधील गुमला जिल्ह्यातील नाचणी या भरडधान्यातील क्रांतीची हार्वर्ड बिझनेस स्कूलनेही दखल घेतली आहे. या दुर्गम भागातील जिल्ह्यातील कृषी-उद्योगासाठी जिल्हाधिकारी सुशांत गौरव यांनी पुढाकार घेतला असून गुमला पूर्व भारताची नाचणीची राजधानी झालेली पाहण्यास आवडेल, असे ते म्हणतात.

उपायुक्त गौरव यांच्या वतीने केंद्र सरकारच्या कौशल्य विकास मंत्रालयाचे महात्मा गांधी नॅशनल फेलो अविनाश कुमार यांनी हार्वर्ड बिझनेस स्कूलमध्ये नाचणीची ही यशोगाथा सादर केली. हार्वर्ड स्कूल नाचणीच्या गुमला मॉडेलचा अभ्यास करत असून इतर आंतरराष्ट्रीय संस्थांनाही याची माहिती पाठविली जाईल. तसेच अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठीही हे मॉडेल वापरले जाईल.

झारखंडची राजधानी रांचीपासून १०० कि.मी.वर असलेल्या गुमलात गौरव यांची नाचणीत केलेल्या कार्याबद्दल लोक प्रशासनातील पंतप्रधान उत्कृष्टता पुरस्कार आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देण्यात आला.

नवी दिल्लीत विज्ञान भवनमध्ये संपृक्तता दृष्टिकोनावर विशेष लक्ष केंद्रित करून आकांक्षी जिल्हा कार्यक्रमाद्वारे सर्वांगीण विकास साधल्याबद्दल गौरव यांना हा पुरस्कार मिळाला. झारखंडला हा पुरस्कार प्रथमच मिळत आहे.

देशभरात प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून केल्या जाणाऱ्या अनुकरणीय कामाबद्दल हा पुरस्कार दिला जातो. यापूर्वी गुमलाची अर्थव्यवस्था पावसावर आधारित शेतीभोवती फिरत होती. या शेतीत तांदळाच्या एकाच पिकाची लागवड केली जात होती. नाचणी लागवडीने मात्र हे चित्रच बदलले.

सुशांत गौरव याबाबत ‘पीटीआय’शी बोलताना म्हणाले, की राष्ट्रीय बियाणे महामंडळाकडून उच्च दर्जाचे बियाणे खरेदी करून नाचणी लागवडीला चालना देण्यात आली. सुरुवातीला १,६०० एकरवर नाचणीची लागवड करण्यात आली.

त्यानंतर हे क्षेत्र ३,६०० एकरपर्यंत वाढले. त्यामुळे निव्वळ उत्पादन सुमारे ३०० टक्क्यांनी वाढले. या यशोगाथेत साक्षी मंडळ समूह या महिला बचत गटाचेही सहकार्य लाभले. आम्ही झारखंडमधील पहिल्याच नाचणी प्रक्रिया केंद्राचीही स्थापना केली. ही केंद्रे केवळ महिलांमार्फत चालविली जातात. या केंद्रात नाचणी लाडू, पीठ व नाचणीच्या इतर पदार्थांची निर्मिती होत आहे.

नाचणीत लोह, कॅल्शिअम, प्रथिने मोठ्या प्रमाणावर असल्याने कुपोषण व रक्तक्षयाविरद्धच्या लढ्यातही मोठी मदत झाली. नाचणीचे लाडू मुलांना माध्यान्ह भोजन योजनेत दिले जात आहेत. त्यामुळे, मुलांची तंदुरुस्ती वाढत आहे, असेही त्यांनी सांगितले. आम्ही गुमला या महत्त्वाकांक्षी जिल्ह्याचे परिवर्तनशील आणि प्रेरणादायी जिल्ह्यामध्ये रूपांतर करू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

गुमलातील नाचणीचे उत्पादन (दैनंदिन)

  • पीठ - एक टन

  • लाडू - ३०० पाकिटे

  • स्नॅक्स - २०० पाकिटे

नाचणीचे उत्पादन, खरेदी व प्रक्रियेची ही यशोगाथा अधिकाधिक लोकांना प्रेरित करत असून अनेकजण नाचणीच्या लागवडीसाठी पुढे येत आहेत. पूर्वीच्या तुलनेत गुमला जिल्ह्यात नाचणी लागवड दहापट झाली असून या महिनाअखेरीस ती तीस हजार एकरांवर पोचण्याची अपेक्षा आहे. केवळ दोन वर्षांतच हा बदल झाला असून पुढील वर्षातच गुमलाला संपूर्ण पूर्व भारताची नाचणीची राजधानी बनवू.

-सुशांत गौरव, जिल्हाधिकारी, गुमला, झारखंड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

Diwali 2024: लक्ष्मीपूजनाच्या दिवशी माता लक्ष्मी अन् भगवान गणेशाला कोणत्या गोष्टी अर्पण कराव्या? वाचा सविस्तर

Ajit Pawar: कोणते 'पवार' जिंकणार? महाराष्ट्र पाहणार आणखी एका काका पुतण्याची लढाई? जाणून घ्या बारामतीची परिस्थिती

SCROLL FOR NEXT