Exit Poll vs Opinion Poll Esakal
देश

Haryana Exit Poll Result: 10 वर्षांचा दुष्काळ संपणार! हरियाणात काँग्रेसचं सरकार? पाहा एक्झिट पोलचा अंदाज...

Vrushal Karmarkar

Haryana Assembly Election Exit Poll Result 2024: हरियाणातील विधानसभेच्या 90 जागांवर मतदान संपले आहे. राज्यातील सर्व जागांवर एकाच टप्प्यात मतदान झाले. मतदान संपल्यानंतर राज्यातील 1031 उमेदवारांचे भवितव्य आता ईव्हीएममध्ये कैद झाले आहे. निवडणूक आयोगाकडून मिळालेल्या माहितीनुसार हरियाणात संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 61 टक्के मतदान झाले. मात्र, मतदानाची अंतिम आकडेवारी येणे बाकी आहे. यावेळी निवडणुकीत मुख्य लढत भाजप, काँग्रेस, जेजेपी आणि आयएनएलडी यांच्यात आहे. भाजप आणि काँग्रेसने 90 पैकी 89 जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत.

या निवडणुकीत भाजप हॅट्ट्रिक करण्याचा प्रयत्न करत आहे. दुसरीकडे विरोधी काँग्रेस पक्ष 10 वर्षांचा दुष्काळ संपवण्यासाठी राजकीय खेळी खेळताना दिसत आहे. या निवडणुकीत मुख्यमंत्री नायब सैनी यांच्यासह काँग्रेस नेते भूपेंद्र हुडा, विनेश फोगट, अनिल विज यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेत्यांचे भवितव्य पणाला लागले आहे. मतदानाचा अंतिम निकाल 8 ऑक्टोबरला समोर येईल, मात्र त्याआधीच एक्झिट पोलचे अंदाज समोर आले आहेत.

ध्रुव रिसर्चच्या सर्वेक्षणातून हरियाणामध्ये बहुमताने काँग्रेसचे सरकार स्थापन होऊ शकते, असे समोर आले आहे. सर्वेक्षणानुसार, हरियाणातील विधानसभेच्या 90 पैकी सुमारे 57 जागा जिंकण्याची अपेक्षा आहे. तर रिपब्लिकच्या एक्झिट पोलनुसार, हरियाणातील विधानसभेच्या 90 जागांपैकी भाजप जवळपास 62 जागांवर आघाडीवर आहे. त्याचवेळी पोलनुसार काँग्रेसला 18 ते 24 जागा मिळू शकतात. याशिवाय जेजेपीला 3 जागा आणि इतरांना 2-5 जागा मिळू शकतात.

एक्झिट पोल आकडेवारी

दैनिक भास्कर- हा एक्झिट पोल 10 वर्षांनंतर हरियाणात काँग्रेसचे पुनरागमन होणार असं सांगत आहे. राज्यात भाजपला 15-29, काँग्रेसला 44-54 जागा मिळताना दिसत आहेत. जेजेपी आघाडीला 1 जागा, INLD आघाडीला 1-5 जागा आणि इतरांना 4-9 जागा मिळताना दिसत आहेत. 
ध्रुव संशोधन- यानुसार, भाजपला 22-32, काँग्रेसला 50-64, इतरांना 2-8 जागा मिळताना दिसत आहेत. 
पीपल्स पल्स एक्झिट पोलनुसार, भाजपला 20 ते 32 जागा, काँग्रेसला 49 ते 61 तर इतरांना 5 ते 8 जागा मिळत आहेत. 
रिपब्लिक इंडिया - मॅट्रिसच्या एक्झिट पोलनुसार, भाजपला 18-24, काँग्रेसला 55-62, जेजेपी आघाडीला 0-3, INLD आघाडीला 03-06 आणि इतरांना 2-5 जागा मिळण्याची शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोदींच्या काँग्रेसवरील टीकेपासून ते वर्षा उसगांवकरांनी केलेल्या मोठ्या खुलाशापर्यंत, वाचा आजच्या महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

Nashik Crime : एमजी रोडच्या मोबाईल मार्केटमध्ये ‘ॲपल’ची बनावट ॲक्सेसरीज्‌; गुन्हे शाखेच्या युनिट एकचा छापा

Russell, Pooran, Hetmyer यांची श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेतून माघार; तर १७ वर्षीय खेळाडूला संघात स्थान

Team India ला मोठा धक्का! Shivam Dube टी-20 मालिकेतून बाहेर, 'या' खेळाडूला मिळाली संधी

Mumbai Metro Line 3 ला मोदींकडून हिरवा कंदील; आधी मजुरांशी संवाद, नंतर विद्यार्थ्यांशी गप्पा, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT