kartik jakhad  
देश

स्क्रीन तुटलेल्या फोनवरून शिकला कोडिंग; शेतकरीपुत्राची १२व्या वर्षी 'हार्वर्ड भरारी'

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - भारतीयांमध्ये प्रचंड क्षमता आहे, हे आपण नेहमीच ऐकतो. मात्र याचं मूर्तीमंत उदाहरण समोर आलं असून एका बारा वर्षाच्या मुलाने सर्वांना अश्चर्यचकित करणारे काम केलं आहे. या मुलाचं नाव कार्तिक जाखड असून त्याने वयाच्या बाराव्या वर्षी अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठात शिकण्यासाठी भरारी घेतली आहे. तुटलेल्या मोबाईल स्क्रीनवर कार्तिकने असा पराक्रम केला, ज्यामुळे त्याचे नाव आता गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवलं गेलं आहे. (haryana boy kartik jakhad develop mobile application)

दिल्लीपासून शंभर किमी अंतरावर असलेल्या हरियाणाच्या झज्जर जिल्ह्यातील झसवा गावात राहणाऱ्या कार्तिक जाखडच्या नावाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे. कार्तिकने तीन लर्निंग अॅप्सचा शोध लावला आहे. मात्र कार्तिकने यासाठी कोणतेही प्रशिक्षण घेतले नाही. त्याने मोबाईलवर व्हिडिओ पाहून अॅप्स तयार करण्याची किमया केली आहे. ज्या फोनद्वारे इयत्ता आठवीत शिकणाऱ्या कार्तिकने कोडिंग शिकून अॅप्स बनवले, त्या मोबाईलची स्क्रीनही तुटलेली होती.

कार्तिकचे वडील अजित सिंह शेती करतात. कार्तिकला तीन बहिणी आहेत, ज्यात तो सर्वात लहान आहे. कार्तिकच्या घरात अभ्यासासाठी टेबल खुर्ची सोडा वीज सुद्धा २४ तास मिळत नाही.

कार्तिक म्हणतो, की तिसरीपासूनच त्याला काहीतरी वेगळं करण्याची इच्छा होती. कोरोनाच्या काळात शाळा बंद होत्या, त्यानंतर वडिलांनी ऑनलाइन क्लासेससाठी 8-10 हजारांचा अँड्रॉइड फोन आणला होता. अभ्यास केल्यानंतर यूट्यूबवर कोडिंग आणि अॅप डेव्हलपमेंटबद्दल व्हिडीओ पाहिले. YouTube वरूनच स्वत:च प्रशिक्षण घेऊन अॅपची निर्मिती केली. अॅप बनवताना कार्तिकला अनेक समस्या आल्या. फोन मध्येच हँग व्हायचा आणि कार्तिकला पुन्हा पुन्हा कोडिंग करावं लागायचं. मात्र या समस्येवरही आपण मात केल्याचं त्याने म्हटलं.

कार्तिकने बनवलेलं पहिलं अॅप जनरल नॉलेजशी संबंधित आहे ज्याचे नाव ल्युसेंट जीके ऑनलाइन आहे, दुसरे अॅप श्री राम कार्तिक लर्निंग सेंटर आहे. ज्यामध्ये कोडिंग आणि ग्राफिक्स डिझायनिंग शिकवले जाते. तर तिसरे अॅप डिजिटल शिक्षणाशी संबंधित आहे, ज्याचे नाव 'श्री राम कार्तिक डिजिटल एज्युकेशन आहे. या लर्निंग अॅप्लिकेशन्सच्या माध्यमातून तो एका संस्थेत सहभागी होऊन सुमारे ४५ हजार गरजू मुलांना मोफत ऑनलाइन शिक्षण देत आहेत.

कार्तिकला वयाच्या १२व्या वर्षी अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. चाइल्ड प्रोडिजी अवॉर्ड, ओएमजी बुक ऑफ रेकॉर्डसह, कार्तिकने ओएमजी बुक ऑफ रेकॉर्डमध्ये सात वेगवेगळ्या प्रकारच्या विक्रमांची नोंद केली आहे. कार्तिकने हार्वर्ड विद्यापीठाची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होऊन शिष्यवृत्ती मिळवली आहे. कार्तिक हार्वर्डमधून कॉम्प्युटर सायन्समध्ये बीएस्सी करत आहे.

कार्तिक म्हणतो की तो अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठातून शिकत असला तरी पुढे जाऊन तो भारतात राहूनच आपल्या देशासाठी काहीतरी करेल. संगणक क्षेत्रात आजपर्यंत कोणीही केले नाही, अस काही करायचं स्वप्न कार्तिकचं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोदींच्या काँग्रेसवरील टीकेपासून ते वर्षा उसगांवकरांनी केलेल्या मोठ्या खुलाशापर्यंत, वाचा आजच्या महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

Nashik Crime : एमजी रोडच्या मोबाईल मार्केटमध्ये ‘ॲपल’ची बनावट ॲक्सेसरीज्‌; गुन्हे शाखेच्या युनिट एकचा छापा

Russell, Pooran, Hetmyer यांची श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेतून माघार; तर १७ वर्षीय खेळाडूला संघात स्थान

Team India ला मोठा धक्का! Shivam Dube टी-20 मालिकेतून बाहेर, 'या' खेळाडूला मिळाली संधी

Mumbai Metro Line 3 ला मोदींकडून हिरवा कंदील; आधी मजुरांशी संवाद, नंतर विद्यार्थ्यांशी गप्पा, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT