nuh clashes ANI
देश

Haryana Nuh Violence: हरियाणा पोलिसांनी दंगलखोरांच्या झोपड्यांवर फिरवला बुलडोझर; योगींची आली आठवण

Haryana Nuh Violence | बुलडोझरची कारवाई तब्बल ४ तास चालली

सकाळ डिजिटल टीम

Haryana Nuh Violence : हरियाणाच्या मेवात-नूह येथे दंगल उसळली होती. यावेळी दंगलखोरांनी मोठी हानी पोचवली होती. आता या प्रकरणावरून पोलीस प्रशासन ऍक्शन मोडवर आले असून पोलिसांनी कारवाई करण्यास सुरु केली आहे.

पोलिसांनी नूहमध्ये रोहिंग्या आणि अवैध घुसखोरांवर मोठी कारवाई केली आहे. यावेळी रोहिंग्यांचा अवैध धंदा आणि अवैध घुसखोरांवर पोलिसांनी बुलडोझर चालवला आहे. या लोकांचा हिंसाचारात सहभाग असल्याचे तपासात समोर आले आहे.

या रोहिंग्यांनी हरियाणा अर्बन डेव्हलपमेंट अथॉरिटीच्या जमिनीवर बेकायदेशीरपणे कब्जा केल्याचे सांगण्यात येत आहे. एवढेच नाही तर सुरुवातीच्या तपासात हे लोक हिंसाचारात सहभागी असल्याचे आढळून आले. अशा स्थितीत पोलिसांनी बुलडोझरच्या सहाय्याने दोनशेहून अधिक झोपडपट्ट्या जमीनदोस्त केल्या. यावेळी कित्येकांना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची आठवण आली.

बुलडोझरची कारवाई तब्बल ४ तास चालली. या झोपडपट्ट्यांमध्ये बांगलादेशातील अनेक लोक बेकायदेशीरपणे राहत असल्याचे सांगण्यात येत आहे. यातील अनेक लोक हिंसाचारात सामील होते.

हरियाणातील हिंसाचाराच्या आरोपींविरुद्ध पोलिसांनी कारवाई तीव्र केली आहे. आतापर्यंत 5 जिल्ह्यांमध्ये 93 एफआयआर नोंदवण्यात आले आहेत. 176 जणांना अटक करण्यात आली आहे. एकट्या नूहमध्ये 46 एफआयआर नोंदवण्यात आले आहेत.

31 जुलै रोजी हरियाणातील मेवात-नूह येथे ब्रिज मंडळ यात्रा काढण्यात आली. यादरम्यान यात्रेवर दगडफेक झाली. काही वेळातच त्याचे दोन समुदायांमध्ये हिंसाचारात रूपांतर झाले. शेकडो गाड्या पेटवल्या. सायबर पोलिस स्टेशनवरही हल्ला झाला. पोलिसांवरही हल्लेखोरांनी हल्ला केला. नुहानंतर सोहना येथेही दगडफेक आणि गोळीबार झाला. वाहने जाळण्यात आली. यानंतर हिंसाचाराची आग नुहपासून फरीदाबाद-गुरुग्रामपर्यंत पसरली. नूह हिंसाचारात दोन होमगार्डसह 6 जणांचा मृत्यू झाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT