Manohar Lal Khattar esakal
देश

Manohar Lal Khattar : एकेकाळी मोदींसोबत मोटारसायकलवर फिरायचे; आज दिला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा, कोण आहेत मनोहरलाल खट्टर?

संतोष कानडे

Haryana Political Crisis : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हरियाणामध्ये राजकीय भूकंप झाला आहे. मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी त्यांच्या मंत्रिमंडळासह राजीनामा दिला. हरियाणात भाजप-जेजेपी युती तुटल्याने खळबळ उडाली आहे.

चंदीगडमध्ये भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर आपल्या मंत्रिमंडळासह राजभवनात पोहोचले आणि त्यांनी संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा सुपूर्द केला. आता दुपारी एक वाजता पुन्हा मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणार आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर देशभर चर्चेत आलेले आहेत. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सर्वात जुने मित्र म्हणून ओळखले जातात. सोमवारी पंतप्रधानांनी द्वारका एक्स्प्रेसवेचं उद्घाटन केलं. त्यावेळी त्यांनी खट्टर यांच्यासोबतच्या जुन्या आठवणी शेअर केल्या.

मनोहरलाल खट्टर यांचं कौतुक करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, हरियाणाच्या विकासासाठी मनोहरलाल खट्टर हे रात्रंदिवस काम करत आहेत. त्यामुळे राज्यात अत्याधुनिक इन्फ्रास्ट्रक्चरचं मोठं नेटवर्क उभं राहिलं. जेव्हा पंतप्रधान संघ प्रचारक म्हणून काम करत होते, तेव्हा ते खट्टर यांच्यासोबत मोटारसायकवर फिरायचे. हरियाणा आणि आसपासच्या परिसरात फिरल्याच्या आठवणी मोदींनी बोलून दाखवल्या.

पंतप्रधान म्हणाले की, मनोहर लालजी आणि मी खूप जुने मित्र आहोत. जमिनीवर झोपण्याची वेळ होती तेव्हा आम्ही एकत्र काम केलेलं आहे. मनोहर लालजींकडे एक मोटारसायकल होती. ते मोटारसायकल चालवायचे आणि मी मागे बसायचो. ते रोहतकहून निघायचे आणि गुरुग्रामला थांबायचे. आम्ही नेहमी मोटारसायकलवरून हरियाणात जायचो, अशी आठवण मोदींनी सोमवारी सांगितली होती.

नरेंद्र मोदी खट्टर यांच्याबद्दल बोलताना पुढे म्हणाले की, त्या काळात रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट होती. मला आठवतंय, त्यावेळी आम्ही मोटरसायकलवरून गुरुग्रामला येत असू, रस्ते छोटे होते. खूप त्रास व्हायचा. आज मी आनंदी आहे, कारण आम्ही एकत्र आहोत आणि राज्यात विकासाची गंगा वाहतेय.

दरम्यान, मंगळवारी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी राजीनामा दिला आहे. हरियाणात विधानसभेच्या 90 जागा आहेत. सध्या 90 जागांपैकी भाजपकडे 41, काँग्रेसकडे 30, आयएनएलडीकडे 10, एचएलपीकडे एक आणि सात अपक्ष आहेत. हरियाणात 46 आमदारांची गरज आहे. मंगळवारी दुपारी पुन्हा शपथविधी होणार आहे. मुख्यमंत्री पदाची माळ खट्टर यांच्याच गळ्यात पडते की नवीन चेहऱ्याला संधी मिळते, हे पाहाणं महत्त्वाचं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT