नवी दिल्ली - हरयाणाचे क्रीडामंत्री संदीप सिंग यांच्याविरोधात एका महिला प्रशिक्षकाने लैंगिक छळाबद्दल तक्रार दाखल केल्याच्या दुसऱ्याच दिवशी, चंदीगड पोलिसांनी शनिवारी हरयाणाचे क्रीडामंत्री संदीप सिंग यांच्याविरोधात एफआयआर दाखल केली आहे. संदीप सिंग यांच्यावर महिला प्रशिक्षकाने पाठलाग करणे, बेकायदेशीरपणे कैद करणे, लैंगिक छळ करणे आणि गुन्हेगारी धमकी दिल्याचा आरोप केला होता.
त्यानंतर त्याच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला होता. शनिवारी रात्री ऑलिम्पियन आणि भारतीय हॉकी संघाचा माजी कर्णधार संदीप सिंग यांच्याविरोधात सेक्टर २६ पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला. एफआयआर दाखल झाल्यानंतर संदीप सिंह यांनी आपला राजीनामा सादर केला आहे.
हरियाणाचे मंत्री संदीप सिंह यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तसेच आपी प्रतिमा खराब करण्याचा" प्रयत्न म्हणून हे आरोप फेटाळून लावले आहेत. 'माझी प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. माझ्यावर लावण्यात आलेल्या खोट्या आरोपांची सखोल चौकशी होईल, अशी मला आशा आहे. जोपर्यंत चौकशी अहवाल येत नाही, तोपर्यंत मी क्रीडा खात्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांकडे सोपवतो, असही ते म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.