नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील हाथरस इथं सत्संगच्या कार्यक्रमात झालेल्या चेंगराचेंगरीत १२० जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणावर महिला आणि बालकांचा समावेश आहे. या भीषण घटनेनं अवघा देश हादरला आहे. पण ही घटना ज्यावेळी घडली तेव्हा त्या सत्संगला गेलेली आणि बचावलेल्या एका तरुणीनं आपबिती सांगितली आहे. तिथली परिस्थिती किती भीषण होती हे तिनं कथन केलं आहे. (Hathras Stampade rescued girl narrated incident how this happened)
या चेंगराचेंगरीतून बचावलेल्या तरुणीनं सांगितलं की, हाथरसच्या जनपद इथं फुलरई मुगलगढी इथल्या एका शेतात हरिबाबा नामक बाबाचा सत्संग चालू होता. या ठिकाणी आपल्या लहान मुलांसह अनेक महिला सत्संग ऐकण्यासाठी आल्या होत्या. या ठिकाणी पुरुषांची संख्याही मोठी होती. साधारण ५० हजार लोकांचा जनसमुदाय या ठिकाणी होता.
पण जसं सत्संगाची समाप्ती झाली त्यानंतर सत्संगवाला बाबाचा ताफा निघाला तेव्हा तिथल्या सेवादारांनी तुफान गर्दी झालेल्या ठिकाणी लोकांना रोखून धरलं. ताफा जाईपर्यंत कडक उन्हात लोक असेच उभे होते. बाबाचा ताफा पुढे गेल्यानंतर या सेवादारांनी लोकांना जायला सांगितलं त्यानंतर एकच गोंधळ उडाला आणि त्यामुळं चेंगराचेंगरी झाली. या भीषण चेंगराचेंगरीत अनेक लोकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर सिकंदराराऊ सीएचसी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं, असं या दुर्घटनेत बचावलेल्या तरुणीनं सांगितलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.