Hathras Stamped sakal
देश

Hathras Stamped : पिलुआ थाने आ जावो, छोटा खतम हो गया;हाथरसच्या चेंगरीचेंगरीतील पीडित पालकाचा आर्त टाहो

सत्संगानंतरच्या चेंगराचेंगरीत निष्पापांचे बळी गेल्याने देश हादरला असून या दुर्घटनेत लहान बालकांचेही हकनाक जीव गेले आहेत. राजस्थान, दिल्लीहून आलेले पालक परत निघण्याच्या तयारीत असताना त्यांच्यावर मुलाच्या मृत्यूची बातमी ऐकण्याची दुर्दैवी वेळ आली.

सकाळ वृत्तसेवा

एटा / हाथरस : सत्संगानंतरच्या चेंगराचेंगरीत निष्पापांचे बळी गेल्याने देश हादरला असून या दुर्घटनेत लहान बालकांचेही हकनाक जीव गेले आहेत. राजस्थान, दिल्लीहून आलेले पालक परत निघण्याच्या तयारीत असताना त्यांच्यावर मुलाच्या मृत्यूची बातमी ऐकण्याची दुर्दैवी वेळ आली. मुलाची ओळख पटविण्यासाठी पोलिस ठाण्यात या असा फोन करण्याची धक्कादायक वेळ काही पालकांवर आली. सत्संगासाठी दिल्लीहून आलेले सत्येंद्र यादव हे परत जाण्यासाठी वाहनतळावर गेले असता अचानक त्यांच्या पत्नीचा फोन आला. तीन वर्षाचा छोटा चेंगराचेंगरीत गमावल्याचे ऐकताच सत्येंद्र हादरले.

२९ वर्षाचे सत्येंद्र हे कुटुंबीयासह येथे आले होते. त्यात आई आणि दोन मेहुणींचा समावेश होता. सत्येंद्र म्हणाले, कार्यक्रम संपण्याच्या काही मिनिटे अगोदर मी, आई आणि चार वर्षाचा मोठा मुलगा मयंक गाडीकडे जाण्यासाठी निघालो. पण गाडीजवळ पोचताच, पत्नीचा फोन खणखणला. तिने फोनवर ‘पिलुआ पोलिस थाने आ जावो, छोटा खतम हो गया है,’ असे सांगितले. या बोलण्यावर सत्येंद्र यांना विश्‍वास बसला नाही. कारण असे काही घडले आहे, याचा थांगपत्ताही लागलेला नव्हता. सगळे काही अविश्‍वसनीय होते. तीन वर्षाचा रोविनला कुटुंबात ‘छोटा’ म्हणून म्हटले जायचे. चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या १२१ जणांत त्याचा समावेश होता. रोविनप्रमाणेच अनेक कुटुंबीयांनी या घटनेत त्यांची मुले गमावले. राजस्थानातील भाऊ-बहिण काव्या (वय ३) आणि आयुष (वय ९) हे जयपूरहून बसने सोमवारी सायंकाळी हाथरसला आले. त्यांचा हा प्रवास शेवटचा ठरला. दोन्ही कुटुंबीयांना धार्मिक कार्यक्रमाच्या ठिकाणी अशा दुर्घटनेची कधीही कल्पना केलेली नव्हती.

चेंगराचेंगरीचा प्रकार सत्येंद्र यादव कुटुंबीयांसाठी खूपच धक्कादायक ठरला. काल रात्री यादव यांनी त्यांच्या गावी मुलावर अंत्यसंस्कार केले. ते म्हणाले, काल कसा गोंधळ उडाला हे मला आठवत नाही, अनेक जण एका महिलेला उचलून घेऊन चालले हेाते. मला वाटते वातावरणामुळे ती बेशुद्ध पडली असेल. पण एवढा भयंकर प्रकार घडला असेल, असे वाटले नाही. पत्नीचा फोन आला, पण माझा आवाज तिच्यापर्यंत पोचत नव्हता. ती काय म्हणत होती, मला काही समजत नव्हते. त्यामुळे तिला वाहनतळापाशी येण्याचे सांगितले. मात्र थोड्यावेळाने पुन्हा तिचा फोन आला. तिने मला पिलुआ पोलिस ठाण्यात येण्याचे सांगितले. चेंगराचेंगरीत मुलगा गेल्याचे सांगत टाहो फोडला.

श्‍वास गुदमरल्याने मृत्यू

हाथरस येथे चेंगराचेंगरीत अनेकांना श्‍वास घेण्यास त्रास झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे एटा येथील रुग्णालयाच्या वरिष्ठ डॉक्टरांनी सांगितले. कालच्या चेंगराचेंगरीत बळींची संख्या अधिक राहिल्याने एटा येथे सामान्य दिवसांच्या तुलनेत एका दिवसांत चार पटीने अधिक संख्येने शवविच्छेदन करावे लागले.

हाथरसच्या फुलरई गावात काल सायंकाळी चेंगराचेंगरीतील २७ मृतदेह जिल्हा रुग्णालयातील शवागारात आणले. १२१ जणांचा मृत्यू झाल्याने त्यांचे मृतदेह लगतच्या जिल्ह्यातील एटा आणि अलिगड येथील रुग्णालयात आणले. एटा येथील २७ मृतदेहांचे विच्छेदन करण्यात आले असून त्यापैकी १९ जणांची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. विसाव्या मृतदेहाचे विच्छेदन मध्यरात्री करण्यात आल्याचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. राममोहन यांनी सांगितले. सहा मृतदेहांची अद्याप ओळख पटलेली नाही. बहुतांश प्रकरणात नागरिकांचा गुदमरून मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. मृतांत महिलांची संख्या अधिक असून त्या ४० ते ५० वयोगटातील आहेत. काल शवविच्छेदनाचे प्रमाण एरवीच्या तुलनेत अधिक राहिले. एका तासांत चार ते पाच शवविच्छेदन केल्याचे ते म्हणाले. पोलिस मंडळ अधिकारी संजय कुमार सिंह यांच्या माहितीनुसार, २७ पैकी २१ मृतदेह एटा रुग्णालयात आणले आणि त्यांची रात्री उशिरापर्यंत ओळख पटविण्यात आली. सर्वांची ओळख पटल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांकडे मृतदेह सुपूर्द केले जातील, असे सिंह म्हणाले.

आश्रमाभोवती पोलिसांचा बंदोबस्त

मैनपुरी (उत्तर प्रदेश) : ज्या भोले बाबा ऊर्फ साकार हरी नारायण यांच्या सत्संगानंतर चेंगराचेंगरी झाली, त्यांच्या आश्रमाबाहेर पोलिसांचा आज कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. घटनेनंतर हे बाबा फरार झाल्याचे काही जणांचे म्हणणे होते. त्यामुळे आश्रमात बाबा आहेत का, असे पोलिसांना विचारले असता त्यांनी उत्तर देण्याचे टाळले. मात्र, ते आश्रमाच्या आतच असल्याचे काही पोलिसांनी नाव न सांगण्याच्या अटीवर पत्रकारांना सांगितले. बिच्छवन भागात असलेल्या या आश्रमात सध्या कोणालाही प्रवेश नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT