Hathras Stampede
Hathras Stampede Esakal
देश

Hathras Stampede: हाथरस दुर्घटनेतील बाबाच्या खोलीत फक्त मुलींनाच प्रवेश दिला जायचा? नारायण साकारबद्दल अनेक धक्कादायक खुलासे

अंकिता खाणे (Ankita Khane)

उत्तर प्रदेशातील हाथरस येथे झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेत १२१ जणांनी आपला जीव गमावला आहे. नारायण साकार उर्फ ​​भोले बाबा याच्या सत्सगादरम्यान ही दुर्घटना घडली आहे. बाबावर श्रद्धा असणारे लोक मोठ्या संख्येने या ठिकाणी संत्सगांसाठी आले होते. आता बाबा आणि कार्यक्रमाच्या आयोजकांवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत आणि बाबाच्या आश्रमाशी संबंधित अनेक खुलासे देखील समोर येत आहेत.

बाबा नेहमी पांढरे कपडे घालायचा आणि त्याच्या खोलीत फक्त मुलींनाच प्रवेश दिला जायचा, असे काही मीडिया रिपोर्ट्सने लिहिले आहे. या भीषण दुर्घटनेत 121 जणांचा मृत्यू झाला असून मोठ्या संख्येने जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

उत्तर प्रदेश पोलिस ते भोले बाबा बनण्याचा प्रवास

नारायण साकार विश्व हरी हा भोले बाबा होण्यापूर्वी उत्तर प्रदेश पोलिसातील हवालदार सूरज पाल सिंह या नावाने ओळखला जात होता. एका हिंदी वाहिनीने सुत्रांच्या हवाल्याने सांगितले की, 58 वर्षीय सूरज पाल सिंह कासगंज जिल्ह्यातील बहादूर नगर गावातील दलित कुटुंबातील आहेत. जे हाथरसपासून 65 किलोमीटर अंतरावर आहे. चेंगराचेंगरीनंतर बाबाच्या गावाला भेट देणाऱ्या एका पोलीस अधिकाऱ्याने उघड केले की, भोले बाबा (सूरज पाल सिंग) याने जवळपास एक दशक पोलीस दलात सेवा केल्यानंतर नोकरी सोडली होती. त्याची शेवटची पोस्टिंग आग्रा येथे झाली होती.

सूरज पाल सिंग विवाहित असून त्याला मूलबाळ नसल्याचीही माहिती समोर येत आहे. पोलीस दलातून बाहेर पडल्यानंतर त्याने आपले नाव बदलून भोले बाबा ठेवले. तर त्याची पत्नी माताश्री म्हणून ओळखली जाते. पाच वर्षांपूर्वी बाबा आपल्याविरुद्ध कट रचल्याचा संशय घेऊन गाव सोडून गेला होता.

बाबाच्या सत्संग कथेला लाखो लोकांची गर्दी झाल्याचे सांगितले जात आहे. त्यात सत्संगानंतर बाबाच्या पायाची धूळ घेण्यासाठी गेलेल्या भाविकांमध्ये चेंगराचेंगरी झाली. ज्यामध्ये 121 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 20 हून अधिक लोक अद्याप बेपत्ता आहेत. तर अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींवर सध्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

School Closed: सिंधुदुर्ग, ठाणे, नवी मुंबईतील शाळांना उद्या सुट्टी जाहीर; मुसळधार पावसाच्या इशाऱ्यामुळं निर्णय

Rain Update: पुन्हा पावसाला सुरूवात; मुंबईसह राज्यासह या भागात 'रेड अलर्ट', हवामान विभागाने दिला सर्तकतेचा इशारा

मुलींच्या मोफत शिक्षणाचा जीआर निघाला! ईडब्ल्यूएस, ओबीसी व एसईबीसी प्रवर्गातील मुलींनाच १०० टक्के शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कमाफी

CNG -PNG Price: सर्वसामान्यांच्या खिशाला लागणार कात्री; CNG-PNGच्या दरात होणार वाढ, जाणून घ्या नवे दर

Russia-Ukraine War: रशियाने कीवमध्ये मुलांच्या रुग्णालयावर डागलं क्षेपणास्त्र, 24 जणांचा मृत्यू; अनेक मृतदेह गाडले, बचावकार्य सुरू

SCROLL FOR NEXT