Hearing on Tamil Nadu-Karnataka kaveri water allocation petition adjourned till 21september sc  esakal
देश

Kaveri River : तमिळनाडू-कर्नाटक कावेरी पाणी वाटप याचिकेवरील सुनावणी २१ पर्यंत पुढे ढकलली

याचिकेवर आज सुनावणी घेणारे न्यायाधीश भूषण गवई हे रजेवर आहेत

सकाळ वृत्तसेवा

बंगळूर : कावेरी नदी पाणीवाटप वादाबाबत तमिळनाडूने दाखल केलेल्या याचिकेची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने २१ सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलली. कावेरीतून पुरेसे पाणी कर्नाटक सोडत नसल्याचा आरोप करत सर्वोच्च न्यायालयात धाव घेणाऱ्या तमिळनाडू सरकारने आणखी पाणी सोडण्याचे आदेश द्यावे, अशा आशयाचा अर्ज दाखल केला आहे.

या याचिकेवर आज सुनावणी घेणारे न्यायाधीश भूषण गवई हे रजेवर आहेत. आपण पुढील आठवड्यात सुनावणीसाठी उपलब्ध नाही, असे स्पष्ट करून तमिळनाडूचे वकील मुकुल रोहतगी यांना सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर जाऊन नवीन खंडपीठाची विनंती केली. रोहतगी यांनी न्यायाधीश भूषण गवई यांना त्यांच्याच खंडपीठात खटला सुरू ठेवण्याची विनंती केली.

नंतर, न्यायाधीश गवई यांनी २१ सप्टेंबरला सुनावणी देण्याचे मान्य केले. कर्नाटक रयत संघटनेने दाखल केलेल्या याचिकेचीही सुनावणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. कावेरी जल व्यवस्थापन प्राधिकरणाने कर्नाटकाला पुढील पंधरवड्यापर्यंत दररोज ५,००० क्युसेक पाणी सोडण्याचे आदेश दिले होते. तमिळनाडूने यावर आक्षेप घेतला.

मात्र यावर कर्नाटकने म्हटले, कावेरी खोऱ्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही. ‘केआरएस’ धरणातही पाणी नाही. त्यामुळे मागणीनुसार पाणी सोडणे कठीण असल्याचे नमूद केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: कसबा विधानसभा मतदारसंघात रवींद्र धंगेकर पहिल्या फेरीत आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: ठाणे पाचपाखाडीमधुन एकनाथ शिंदे आघाडीवरच

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

SCROLL FOR NEXT