heat wave warning issued for the next 5 days for 7 states of country Madhya Pradesh Rajasthan Haryana UP Delhi  
देश

Heat Wave : मध्य अन् उत्तर भारतात होरपळतोय! राजस्थानातील बारमेरचा पारा ४९ अंशांवर

Heat Wave Update :गेल्या काही दिवसांपासून दिल्लीसह उत्तर भारतात उष्णतेची लाट असून राजस्थानमधील बारमेरमध्ये ४९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

रोहित कणसे

नवी दिल्ली : हवामान खात्याने देशातील सात राज्यांसाठी पुढील पाच दिवसांसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला असून राजस्थानमध्ये रात्रीचे तापमान ३० अंशांपेक्षाही अधिक असल्याचे दिसून आले. मध्य अन् उत्तर भारत अक्षरशः होरपळून निघत आहे.

गेल्या काही दिवसांपासून दिल्लीसह उत्तर भारतात उष्णतेची लाट असून राजस्थानमधील बारमेरमध्ये ४९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. पुढील काही दिवस ही लाट कायम राहणार आहे. यामुळे लोकांनी उन्हात अधिक काळ राहू नये असा इशारा केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने दिला आहे. दिल्लीसह मध्यप्रदेश, राजस्थान, हरियाना आणि उत्तरप्रदेश या भागांत उष्णतेची लाट आली आहे.

या राज्यांत विविध ठिकाणांवरचे तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक नोंदविले जात आहे. विदर्भातील अकोला, वाशीम, अमरावती, जळगाव या जिल्ह्यांतही उष्णतेची लाट आहे. दिल्ली व हरियाना राज्यांमध्ये उद्या (ता.२५) मतदान होणार आहे. या मतदानाच्या दिवशी सुद्धा उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचे हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजात म्हटले आहे. त्यामुळे मतदानावर याचा परिणाम होऊ शकतो. दिल्लीतील आजचे कमाल तापमान ४१ अंश सेल्सिअस एवढे नोंदले गेले. परंतु काही दिवसांपूर्वी दिल्लीतील कमाल तापमान ४४ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते.

येथेही उष्णता

उष्णतेची लाट हरियानातील सर्व जिल्ह्यांमध्ये जाणवत आहे तर राजस्थानमधील पाली, जैसलमेर, जोधपूर, बारमेर या भागासह मध्यप्रदेशातील सिहोर, शिवपुरी, ग्वाल्हेर, मुरैना, उत्तरप्रदेशातील आग्रा, झाशी या भागातही चांगलेच चटके जाणवू लागले आहेत. या लाटेमुळे केंद्रीय आरोग्य विभागाने जनतेसाठी सावधगिरीचा इशारा दिला आहे. या लाटेची तीव्रता आणखी काहीकाळ राहू शकते असा इशारा त्यांच्याकडून देण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा trump सरकार! कमला हॅरिस यांचा पराभव करत पुन्हा बनणार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, बहुमताचा आकडा केला पार

Hot Water Side Effects :  आरोग्यासाठी चांगलं असलं तरी अशा लोकांनी कधीच पिऊ नये गरम पाणी, त्रास अधिक वाढेल

Devendra Fadnavis: राहुल गांधींच्या हातातील संविधान 'लाल' का? देवेंद्र फडणवीसांनी का घेतली शंका?

Maharashtra Vidhansabha: विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपचा 'कलरकोड' प्लॅन, जाणून घ्या आतल्या गोटातील बातमी

Shreyas Talpade : "मी अक्षयचा आयुष्यभर ऋणी " ; हार्टअटॅकनंतर अक्षयकुमारने श्रेयसला अशी केली मदत

SCROLL FOR NEXT