Heavy rains in himachal pradesh Nine victims in various rain-related accidents Chandigarh-Manali National Highway open for traffic sakal
देश

Rain Update : हिमाचल प्रदेशात पावसाचे थैमान; पावसाशी संबंधित विविध दुर्घटनांत नऊ बळी

अचानक आलेल्या पुरामुळे गेल्या २४ तासांपासून बंद असलेला चंडीगड-मनाली राष्ट्रीय महामार्ग अखेर वाहतुकीसाठी खुला

सकाळ वृत्तसेवा

सिमला : हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसामुळे दरडी कोसळल्याने व अचानक आलेल्या पुरामुळे गेल्या २४ तासांपासून बंद असलेला चंडीगड-मनाली राष्ट्रीय महामार्ग अखेर वाहतुकीसाठी खुला झाला.

रविवारी संध्याकाळपासून हा महामार्ग बंद असल्याने मंडी जिल्ह्यात पर्यटकांसह शेकडोजण अडकून पडले होते. पावसाशी संबंधित विविध दुर्घटनांत आतापर्यंत नऊजणांचा मृत्यू झाला आहे.

मंडी शहरापासून ४० कि.मी. अंतरावरील खोटिनल्लाह येथे अचानक आलेल्या पुरामुळे महामार्गाचा मंडी ते कुलू हा ७० कि.मी.चा टप्पा बंद करण्यात आला होता.

त्याचप्रमाणे, सहा मैल परिसरात दरड कोसळल्याने मंडी ते पांडोह हा टप्पाही बंद केला होता. मात्र, प्रशासनाने दरडीचा ढिगारा काढून रस्ता मोकळा केला. त्यानंतर, तब्बल २४ तासांनी हा महामार्ग पुन्हा सुरू झाला.

दरम्यान, हिमाचल प्रदेशात अनेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस सुरू असून उद्या (ता. २८) आणि परवा (ता.२९) हवामान खात्याने मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्याचप्रमाणे शुक्रवार (ता.३०)

आणि शनिवारी (ता.१) विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचीही शक्यता आहे. बिलासपूरमधील बर्टिनमध्ये ६६ मि.मी, माशोब्रात ४६ मि.मी. तर गोहरमध्ये २८ मि.मी. आणि सिमल्यात २३ मि.मी. पावसाची नोंद झाली.

पावसाचा फटका

  • ११६ - बंद रस्ते

  • ७० - पाणीपुरवठा योजना विस्कळित

  • १०६ - ट्रान्सफॉर्मरचे नुकसान

  • १०२ - कोटी रुपयांचे एकूण नुकसान

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Candidates List: एकेकाळी विश्वासू सहकारी असलेल्या धंगेकरांविरोधात राज ठाकरेंनी दिला 'हा' उमेदवार

Congress Candidate List: काही जागांवर मैत्रीपूर्ण लढतीशिवाय पर्याय नाही? महाविकास आघाडीमध्ये पेच; आजच्या बैठकीत काय ठरलं?

आमिर खानचा तो सल्ला न मानल्यामुळे महेश कोठारेंचं झालं अतोनात नुकसान ; राहतं घर विकण्याची आली पाळी

Maratha Candidates : मुंबईतील इच्छुक मराठा उमेदवारांची यादी आली समोर; मनोज जरांगे शिक्कामोर्तब करणार का?

Latest Maharashtra News Updates Live : चंद्रशेखर बावनकुळेंचा बंडखोरांना इशारा

SCROLL FOR NEXT