नवी दिल्ली : पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्याने यमुना नदीने रौद्र रुप धारण केले आहे. हरियानाबरोबरच राजधानी दिल्लीचा मोठा भाग यमुना नदीच्या कक्षेत येतो. त्यामुळे पातळीत होणारी वाढ पाहता यमुनानगर प्रशासनाने यमुना नदी वाहणाऱ्या क्षेत्रात सावधानतेचा इशारा दिला आहे. दिल्लीत यमुना नदीने आज २०४.५ मीटरची पातळी गाठली असून ती लवकरच धोक्याची पातळी ओलांडेल, असे प्रशासनाने सांगितले.
दिल्ली पूर नियंत्रण कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, ओल्ड दिल्ली रेल्वे ब्रिजने पहाटे एक वाजता धोक्याचा इशारा दिला आणि सोमवारी सकाळी आठ वाजता २०४.७ मीटर ही धोक्याची पातळी गाठली. केंद्रीय पाणी आयोग (सीडल्यूसी) ने लवकरच यमुना २०५ मिटरची पातळी ओलांडेल, असे म्हटले आहे. पर्वतीय भागात आणि पाणलोट क्षेत्रात काल पाऊस पडल्याने हथिनीकुंड धरणात यमुनेची पातळी अचानक वाढू लागली.
सजगतेचे निर्देश
हथिनीकुंड येथून विसर्ग प्रचंड असल्याने नागरिकांना नदीकाठापासून दूर राहण्याचा व सखल भागात राहणाऱ्या नागरिकांना जागा सोडण्याचे निर्देश दिले आहेत. सिंचन विभागाचे अभियंते आर.एस. मित्तल म्हणाले की, दिल्लीत येत्या दोन दिवसांत पाणी पोचेल. दिल्लीत पूररेषेत राहणाऱ्या नागरिकांची संख्या ३७ हजार आहे. १२ ऑगस्ट रोजी यमुनेने २०५.३३ मीटर ही धोक्याची पातळी गाडली हेाती. त्यावेळी सात हजार नागरिकांना स्थलांतरित केले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.