चेन्नई : देशाचे संरक्षणदल प्रमुख बिपिन रावत (CDS Bipin Rawat) यांचे हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची माहिती मिळाली आहे. तमिळनाडूमधील उटी जिल्ह्यातील कन्नुर येथे लष्कराचं हेलिकॉप्टर (indian army helicopter crashes) क्रॅश झालं आहे. हेलिकॉप्टरमध्ये लष्कराचे काही अधिकारी असल्याचं समजतंय. बचाव आणि मदत कार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आलं आहे
लष्कराचे वरिष्ठ अधिकारी प्रवास करत होते?
मिळालेली माहिती अशी, की तमिळनाडू येथील उटीमध्ये लष्कराच्या हेलिकॉपरचा (CDS Bipin Rawats helicopter crashes) भीषण अपघात झाला आहे. उटी येथे लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं आहे. या हेलिकॉप्टरमधून लष्कराचे वरिष्ठ अधिकारी प्रवास करत होते. त्यात सीडीएस बिपीन रावत यांचा समावेश असल्याची माहिती मिळाली आहे. या हेलिकॉप्टरमधून एकूण नऊजण प्रवास करत होते. त्यात माजी लष्करप्रमुख आणि सीडीएस बिपीन रावत हे पत्नीसह प्रवास करत होते. या अपघातात तेही जखमी झाल्याचं वृत्त आहे. मात्र, लष्कराकडून या वृत्ताला अद्याप दुजोरा देण्यात आलेला नाही.
खराब हवामानामुळे हा अपघात
तामिळनाडूच्या कुन्नूर येथील जंगलात ही दुर्घटना घडली. खराब हवामानामुळे हा अपघात झाल्याचं सांगितलं जातं. हेलिकॉप्टर दुर्घटनेतील जखमींना जवळच्या वेलिंग्टन बेसमध्ये नेण्यात आलं असून तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
हेलिकॉप्टरमधून प्रवास करणारे अधिकारी
सीडीएस बिपीन रावत
मधुलिका रावत
ब्रिगेडियर एल. एस. लिड्डर
लेफ्ट. कर्नल हरजिंदर सिंग
गुरुसेवक सिंग
जितेंद्र कुमार
विवेक कुमार
बी. साई तेजा
हवालदार सतपाल
हा अपघात अत्यंत भीषण होता
तामिळनाडूतल्या कुन्नूर परिसरात लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले. सीडीएस बिपिन रावत यांच्यासह पत्नी, संरक्षण सहाय्यक, सुरक्षा कमांडो आणि आयएएफ पायलट यांच्यासह एकूण 14 लोक हेलिकॉप्टरमध्ये होते. सीडीएस बिपिन रावत हे या अपघातात जखमी असल्याचे सांगण्यात येत असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कुन्नूरच्या घनदाट जंगलात चारही बाजूने झाडच झाडं आहेत. हा अपघात अत्यंत भीषण होता. अपघात होताच जंगलात आग लागली. या दुर्घटनेची माहिती मिळतात हवाई दल आणि लष्कराची पथकं घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं.हे हेलिकॉप्टर एमआय-सीरिजचं असल्याचं सांगितलं जातं. MI-17, V-5 या सीरिजचं हे हेलिकॉप्टर होतं. बिपीन रावत यांच्यासोबत काही अधिकारी आणि कर्मचारीही होतं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.