rajnath singh 
देश

राजनाथ सिंहांनी लोकसभेत सांगितला हेलिकॉप्टर दुर्घटनेचा तपशील

चार मिनिटांच्या या निवेदनात त्यांनी घटनेची पूर्ण माहीती दिली.

दत्ता लवांडे

दिल्ली : CDS जनरल बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेची (Helicopter Crash) माहिती संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी आज संसदेत दिली. चार मिनिटांच्या या निवेदनात त्यांनी घटनेची पूर्ण माहीती दिली असून CDS रावत, त्यांची पत्नी आणि बाकीच्या ११ अधिकाऱ्यांना श्रद्धांजली यावेळी वाहण्यात आली आहे.

राजनाथ सिंह यांनी लोकसभेत बोलताना सांगितलं की, ''जनरल रावत हे वेलिंग्टन च्या डिफेंस सर्विस कॉलेजमध्ये नियोजित दौऱ्यावर होते. काल ११ वाजून ४८ मिनिटांनी उड्डाण केले होते. १२ वाजून १५ मिनिटांनी पोहोचणं अपेक्षित होतं पण १२ वाजून आठ मिनिटांनी त्यांच्या हेलिकॉप्टरचा एअर ट्रॉफिक कंट्रोल पासून संपर्क तुटला.

स्थानिक लोकं घटनास्थळी पोहचल्यानंतर त्यांनी त्या हेलिकॉप्टरला जळताना पाहिले. बचाव पथक पोहचल्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांना आगीरून बाहेर काढले. त्यानंतर अपघातग्रस्त अधिकाऱ्यांला वेलिंग्टन येथील लष्कर हॉस्पीटलमध्ये हलवले. तेथे CDS रावत आणि त्यांच्या पत्नीसहीत ११ जणांचा मृत्यू झाल्याचे कळाले असेही राजनाथ सिंह यांनी सांगितले.

मृतांमध्ये ब्रिगेडियर एलएस लिद्दर,लेफ्टनंट कर्नल हरजिंदर सिंह, विंग कमांडर पीएस चौहान, स्क्वॉड्रन लीडर के. सिंह, नायक गुरसेवक सिंह, नायक जितेंद्र कुमार, लांस नायक विवेक कुमार, लांस नायक बी. साई तेजा, ज्युनियर वारंट ऑफिसर दास, ज्युनियर वारंट ऑफिसर ए. प्रदीप आणि हवलदार सतपाल यांचा सामावेश असल्याची माहिती राजनाथ सिंह यांनी दिली.

दुर्घटनेमध्ये ग्रुप कॅप्टन वरूण सिंह गंभीर जखमी असून त्यांच्यावर वेलिंग्टन येथील लष्कर हॉस्पीटलमध्ये उपचार चालू आहेत. त्यांना वाचवण्याचे प्रयत्न चालू असून CDS रावत आणि त्यांच्या पत्नीचे मृतदेह आज दिल्लीला आणले जातील. लष्कराच्या सर्व अधिकाऱ्यांचे अंतिम संस्कार सम्मानपूर्वक व लष्करी इतमातात केले जातील. एअर चाफ मार्शल वीआर चौधरी यांना काल पाठवले असून एअर मार्शल मानवेंद्र सिंग यांच्या नेतृत्वाखाली चौकशीचे आदेश दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Voting Live: सांगोला मतदार केंद्राबाहेर शेकाप - ठाकरे गटाचे कार्यकर्ते भिडले

Voting Percentage: दुपारी १ वाजेपर्यंतची आकडेवारी समोर; महाराष्ट्र की झारखंड, मतदानात कोण ठरला मोठा भाऊ?

Adani Group: अदानी समूह देणार रिलायन्सच्या जिओ वर्ल्ड सेंटरला टक्कर; मुंबईत उभारणार सर्वात मोठे कन्व्हेन्शन सेंटर

Assembly Election Voting 2024: ऐन मतदानाच्या दिवशी महाविकास आघाडीत फूट, उद्धव ठाकरेंना टेन्शन...काँग्रेसने भूमिका बदलली?

गोड पण गूढ पण! प्रसाद ओक, स्वप्निल जोशी आणि शिवानी सुर्वेच्या '‘जिलबी’चा पोस्टर रिलीज; 'या' दिवशी येतेय भेटीला

SCROLL FOR NEXT