Hemant Soren  
देश

Hemant Soren: तुरुंगातून बाहेर आल्यानंतर हेमंत सोरेन पुन्हा होणार मुख्यमंत्री; चंपई सोरेन यांनी दिला राजीनामा

Amit Ujagare (अमित उजागरे)

रांची : तुरुंगातून बाहेर आल्यानंतर हेमंत सोरेन पुन्हा एकदा मुख्यमंत्री होणार आहेत. त्यासाठी झारखंडचे मुख्यमंत्री चंपई सोरेन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर हेमंत सोरेन हे पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. यासाठी ते राजभवनाच्या दिशेनं निघाले आहेत. (Hemant Soren will become CM again after coming out of jail Champai Soren resigned)

आघाडीचे नेते आणि आमदारांनी मुख्यमंत्री चंपई सोरेन यांच्या निवासस्थानी एका बैठकीत सर्वसंमतीनं हेमंत सोरेन यांना झारखंड मुक्ती मोर्चा अर्थात जेएमएमच्या विधीमंडळ पक्षाचा नेता म्हणून निवड केली. त्यामुळं आता हेमंत सोरेन हे तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यामुळं हेमंत सोरेन हे झारखंडचे १३ वे मुख्यमंत्री बनतील.

दरम्यान, कथीत जमीन घोटाळा प्रकरणी हेमंत सोरेन यांना ईडीनं मुख्यमंत्रीपदावर असताना अटक केली होती. त्यामुळं सोरेन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता, तर पक्षाचे वरिष्ठ नेते चंपई सोरेन यांना मुख्यमंत्रीपदी बसवलं होतं.

पण आता हेमंत सोरेन हे जामीनावर तुरुंगातून बाहेर आले आहेत. झारखंड हायकोर्टानं २८ जून रोजी हेमंत सोरेन यांना नियमित जामीन मंजूर केला होता. यावेळी हायकोर्टानं ईडीच्या अटकेवर अनेक प्रश्न उपस्थित करत ईडीला चांगलीच चपराक दिली होती. सोरेन यांचा या घोटाळ्यात प्राथमिकदृष्ट्या कुठलाही संबंध नसल्याचं दिसून येत असल्याचं हायकोर्टानं म्हटलं होतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हौस ऑफ बांबू : अभिजाताचे श्रेय कुणाला..?

योग निद्रा : मन अन् शरीरस्वास्थ्याची अनुभूती

गायत्री ध्यान

विज्ञानवाटा : शास्त्रज्ञांनी साकारले तलम सुवर्णपान

‘आहाराकडे जास्त लक्ष आवश्यक’

SCROLL FOR NEXT