देश

#BoycottMyntra पोस्ट करण्याआधी जाणून घ्या 'हे' सत्य

नेटकरी का व्यक्त करत आहेत संताप?

स्वाती वेमूल

२२ ऑगस्ट रोजी देशभरात रक्षाबंधन साजरा होत असताना सोशल मीडियावर 'मिंत्रा' Myntra या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर बंदी आणण्याची जोरदार मागणी केली जात होती. #BoycottMyntra हा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड होत आहे. मिंत्रावरून अनेकजण दररोज कपडे आणि इतर वस्तू खरेदी करतात. त्यामुळे अचानक त्यावर बंदीची का मागणी होतेय, असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. हे नेमकं काय प्रकरण आहे, ते जाणून घेऊयात..

नेमकं काय आहे प्रकरण?

सोशल मीडियावर काही क्रिएटिव्ह फोटो व्हायरल होत आहेत. त्यापैकीच एका फोटोमध्ये भगवान श्रीकृष्ण मिंत्रा अॅपवर साडी शोधताना दिसत आहेत. तर बॅकग्राऊंडमध्ये दु:शासन द्रौपदीचं वस्त्रहरण करताना दिसत आहे. या फोटोमुळे हिंदुंच्या धार्मिक भावना दुखावल्याचं म्हणत मिंत्रावर बंदीची मागणी केली जात आहे.

२०१६चं आहे प्रकरण

व्हायरल झालेला फोटो हा पाच वर्षे जुना आहे. २०१६ मध्ये हाच फोटो व्हायरल झाला होता आणि तेव्हासुद्धा मिंत्रावर बंदीची मागणी केली होती. 'स्क्रोल ड्रोल' या वेबसाइटने त्यांच्या एका लिस्टिकलमध्ये या फोटोंचा वापर केलाहोता. फेब्रुवारी २०१६ मध्ये हे लिस्टिकल प्रदर्शित झालं होतं आणि त्यावेळी यावरून वाद निर्माण झाला होता.

मिंत्राचं स्पष्टीकरण

या संपूर्ण प्रकरणावर मिंत्राकडून स्पष्टीकरण देण्यात आलं होतं. 'हे आर्टवर्क आम्ही बनवलं नसून त्याचं समर्थनसुद्धा आम्ही करत नाही', असं मिंत्राने स्पष्ट केलं होतं. त्यानंतर 'स्क्रोलड्रोल'कडून जाहीर माफी मागण्यात आली होती. 'या आर्टवर्कची जबाबदारी आम्ही घेतो आणि मिंत्राचं त्याच्याशी काही देणंघेणं नाही', असं त्यांनी म्हटलं होतं.

काही नेटकऱ्यांचा विरोध

आता पुन्हा एकदा तेच जुने फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून मिंत्रावर बंदी आणण्याची मागणी केली जात आहे. मी आणि माझे कुटुंबीय आता मिंत्रावरून कोणतीच खरेदी करणार नाही, असं एकाने लिहिलंय. तर 'मिंत्रासारख्या कंपन्या हिंदू सणांनाच का टारगेट करतात, हिंदुंच्या धार्मिक भावना का दुखावतात', असा सवाल दुसऱ्याने केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Results: लाडकी बहीण पावली! महायुतीला 'एक हे तो सेफ हे'ची जोड अन् झटक्यातच मविआचा हिरमोड

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अंधेरी पूर्व विधानसभेत मुर्जी पटेल आघाडीवर

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

SCROLL FOR NEXT