कन्याकुमारी येथून सुरु झालेली काँग्रेसची भारत जोडो यात्रा आता महाराष्ट्रात दाखल झाली आहे.
कन्याकुमारी येथून सुरु झालेली काँग्रेसची भारत जोडो यात्रा (Congress Bharat Jodo Yatra) आता महाराष्ट्रात दाखल झालीय. हजारो मशाल हाती घेऊन खासदार राहुल गांधींच्या नेतृत्वात निघालेली ही यात्रा सोमवारी रात्री महाराष्ट्रात दाखल झाली. राहुल गांधींची (Rahul Gandhi) यात्रा सोमवारी रात्री महाराष्ट्रात देगलूर इथं दाखल झाली आहे. मात्र, आता भारत जोडो यात्रेबाबत महत्वाची बातमी समोर येत आहे.
काँग्रेस आणि भारत जोडो यात्रेचं ट्विटर अकाऊंट ब्लॉक करण्याच्या बंगळुरू न्यायालयाच्या आदेशाला दुसऱ्याच दिवशी मंगळवारी कर्नाटक उच्च न्यायालयानं (Karnataka High Court) स्थगिती दिली. ट्विटर, फेसबुक, यूट्यूब व इंस्टाग्रामवरून कॉपीराइटचं उल्लंघन केलेली सर्व सामग्री हटवा, असं निर्देश देत न्यायालयानं काँग्रेसला हा दिलासा दिला.
कॉपीराइट नियम (Copyright Rules) उल्लंघनाच्या आरोपावरून बंगळुरू न्यायालयानं (Bangalore Court) काँग्रेस आणि भारत जोडो यात्रेचं ट्विटर अकाऊंट ब्लॉक करण्याचा आदेश सोमवारी दिला होता. त्या आदेशाला काँग्रेसनं आव्हान दिलं होतं. कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशाला मंगळवारी स्थगिती देताना उच्च न्यायालयानं काँग्रेसला कॉपीराइटचं उल्लंघन करणारी सोशल मीडियातील सामग्री हटवण्यासाठी बुधवारपर्यंतचा वेळ दिला होता.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.