ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यामध्ये काल सायंकाळी सातच्या सुमारास तीन रेल्वे गाड्यांचा मोठा अपघात झाला. या भयंकर अपघातातील मृतांची संख्या 233 वर पोहोचली आहे. 300 च्या आसपास लोक गंभीर जखमी झाले आहेत. तसेच अपघातात आतापर्यंत 900 पेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले आहेत. कालपासून सुरू असलेलं बचाव कार्य अजूनही सुरू आहे.
हा भीषण अपघात झाला तेव्हा या अपघातात 50 ते 70 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. रात्री उशिरा हा आकडा 120 वर पोहोचला. तसेच जखमींचा आकडाही 350 वर गेला. मात्र, सकाळपर्यंत मृतांचा आकडा 233 आणि जखमींचा आकडा 900 झाला आहे. अजूनही बचावकार्य सुरू असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
आज सकाळी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी घटनास्थळाची भेट घेतली. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला यावेळी बोलताना वैष्णव म्हणाले की,' हा एक वेदनादायी आणि मोठा अपघात आहे. रेल्वे, एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि राज्य सरकार बचाव कार्य करत आहेत. उत्तम आरोग्य सुविधा पुरवल्या जात आहेत. काल भरपाई जाहीर करण्यात आली आहे. अपघातातील जखमींना सर्वतोपरी मदत केली जाईल. या अपघाताच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे.
या अपघाताच्या संदर्भात केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी तेथील आधिकाऱ्यांशी चर्चा देखील केली आहे.यासोबतच रेल्वे सुरक्षा आयुक्तही घटनास्थळी भेट देऊन अपघाताचे कारण काय याची चौकशी करणार असल्याचंही त्यांनी म्हंटलं आहे.
अपघातानंतर रेल्वेकडून हेल्पलाईन नंबर जारी
हावडा : 033 - 26382217
खडगपूर : 8972073925, 9332392339
बालासोर : 8249591559, 7978418322
शालीमार (कोलकाता) : 9903370746
रेलमदद : 044- 2535 4771
बहनागा स्टेशनजवळ SMVB-हावडा एक्सप्रेस (12864), कोरोमंडल एक्सप्रेस आणि मालगाडीची टक्कर झाली. प्रथम हावडा एक्सप्रेस मालगाडीला धडकली, त्यानंतर मालगाडी कोरोमंडलला धडकली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.