Parliament Special Session  Esakal
देश

Parliament Special Session : विशेष अधिवेशनापूर्वी भाजपच्या बैठकीमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा, खासदाराने निमंत्रण पत्रिका फाडली अन्...

संसदेच्या विशेष अधिवेशनापूर्वी काल (रविवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती

अंकिता खाणे (Ankita Khane)

संसदेचे विशेष अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे. हे अधिवेशन २२ सप्टेंबर पर्यंत चालणार आहे. यंदाचे अधिवेशन हे नवीन संसद भवनात पार पडणार आहे. विशेष अधिवेशनाच्याकाळात संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या एकूण ५ बैठका होतील. दरम्यान संसदेच्या विशेष अधिवेशनापूर्वी काल (रविवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये मोठा गोंधळ दिसून आला आहे.(Latest Marathi News)

एका निमंत्रण पत्रिकेवरून हा मोठा गोंधळ दिसून आला आहे. डीएमकेचे खासदार त्रिची शिवा यांनी निमंत्रण पत्रिकेवरून संताप व्यक्त केला. त्यानंतर सर्वांनी खासदार त्रिची शिवा यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी समजूत काढल्यानंतर खासदार त्रिची शिवा शांत झाले.

काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व पक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीसाठी डीएमकेचे खासदार त्रिची शिवाही उपस्थित होते. यावेळी नवीन संसदेत झालेल्या ध्वजारोहणाच्या निमंत्रण पत्रिकेवरून मोठा ड्रामा झाला. डीएमके खासदार त्रिची शिवा यांनी बैठकीमध्येच सर्वांसमोर निमंत्रण पत्रिका फाडली. हिंदी भाषेत निमंत्रण पत्रिका होती त्याचा संताप व्यक्त करत सरकार हिंदी भाषा थोपत असल्याचा आरोप करत त्यांनी पत्रिका फाडली.(Latest Marathi News)

खासदार त्रिची शिवा यांनी निमंत्रण पत्रिका इंग्रजीमधून का दिली नाही? हिंदी भाषेत पत्रिका का दिली? असा प्रश्न उपस्थित केला आहे. त्रिची शिवा यांच्या संताप पाहिल्यानंतर इतर खासदारही गोंधळून गेले. त्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी त्रिची शिवा यांची समजूत काढली. त्यानंतर ते शांत झाले. यासंबधीचे वृत्त 'टिव्ही ९ हिंदी'ने दिले आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Pawar: रोहित पवारांचा डायहार्ड फॅन! मताधिक्य कमी-जास्त होत असल्यानं हार्टअटॅकनं आणखी एका कार्यकर्त्याचा मृत्यू

Virat Kohli याला आमची नाही, तर आम्हाला त्याची गरज...; जसप्रीत बुमराह नक्की काय म्हणाला, वाचा

Sangli Election Results : 83 जणांचे 'डिपॉझिट' जप्त, मातब्बर नेत्‍यांचा समावेश; सोळा लढले, बाकीचे फक्त नडले

CM Eknath Shinde: ''एकनाथ शिंदेंनाच मुख्यमंत्री करा'' महाराष्ट्रातील संतांच्या वंशजांचं पंतप्रधानांना पत्र

Latest Marathi News Updates : नागपूरमधील CM एकनाथ शिंदेंच्या शासकीय निवासस्थानासमोरील नावाची पाटी काढली

SCROLL FOR NEXT