नवी दिल्ली : देशात कोरोना महामारीचं (corona pandemic) संकट अद्यापही शमलेलं नाही. केंद्र सरकारपासून राज्य सरकारे लोकांना दिलासा देण्यासाठी आपापल्या पातळीवर शक्य ते प्रयत्न करत आहेत. दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून कोरोनाच्या स्थितीची वारंवार माहिती दिली जात आहे. दरम्यान, सहा राज्यांमध्ये कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू (Higher Corona death toll) झाल्याची माहिती दिली. (Higher Corona death toll among six states in the country says Ministry of Health)
आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल म्हणाले, "केवळ सात राज्ये अशी आहेत जिथं १०,००० हून अधिक कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. तर ५ ते १० हजार रुग्णसंख्या आढळून येणारी ६ राज्ये आहेत. तर इतर सहा राज्यांमध्ये कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. यामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, पंजाब आणि दिल्ली या राज्यांचा समावेश आहे. गेल्या २० दिवसांपासून देशात अॅक्टिव्ह रुग्णांमध्ये घट झाली आहे. ३ मे रोजी देशात १७.१३ टक्के अॅक्टिव्ह प्रकरणं होती आता ही संख्या ११.१२ टक्के झाली आहे. रिकव्हरी रेट देखील ८७.७६ टक्के झाला आहे. तसेच देशभरात २ कोटी लोक रिकव्हर झाले आहेत.
आठ राज्यांमध्ये एक लाखांहून अधिक अॅक्टिव्ह प्रकरणं
लव अग्रवाल म्हणाले, "एक लाखांहून अधिक सक्रिय प्रकरणं आता केवळ आठ राज्यांमध्ये आहेत. ५० हजार ते १ लाखांमध्ये अॅक्टिव्ह प्रकरणं असलेली आठ राज्ये आहेत. तर ५० हजारांहून कमी अॅक्टिव्ह प्रकरणं असलेल्या २० राज्यांमध्ये राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांचा समावेश आहे."
७८ टक्के नवी प्रकरणं १० राज्यांमध्ये
आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, "गेल्या २४ तासांमध्ये देशात २,५७,००० प्रकरणांची नोंद झाली. तर ३,५७,६३० लोक रिकव्हर झाले आहेत. ७८ टक्के नव्या प्रकरणांची १० राज्यांमधून नोंद झाली आहे. केवळ ७ राज्यांमध्ये प्रतिदिन १०,००० हून अधिक प्रकरणांची नोंद झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.