कर्नाटकमध्ये हिजाब परिधान करण्यावरून वाद सुरू झालाय.
कर्नाटकमध्ये हिजाब (Hijab Row) परिधान करण्यावरून वाद सुरू झालाय. इथं मुस्लिम विद्यार्थिनींना शाळा किंवा कॉलेजमध्ये हिजाब घालण्याला विरोध केला जात आहे. आता हा वाद संपण्याचं नाव घेत नाहीय. मंगळुरू (Mangaluru) शहरात या मुद्द्यावरून वादाची बातमी समोर आलीय. मंगळुरूच्या पी दयानंद पै (P Dayananda Pai) सरकारी महाविद्यालयात (Government College) डोक्यावर ओढणी घेऊन परीक्षेला बसू दिल्याचा दावा विद्यार्थ्यांच्या एका गटानं केल्यानंतर, परीक्षेदरम्यान वाद निर्माण झाला. आंदोलक विद्यार्थ्यांनी दावा केलाय की, मुख्याध्यापकांनी मुस्लिम विद्यार्थिनींना डोक्यावर ओढणी घेऊन परीक्षेला बसण्याची परवानगी दिली होती, असं त्यांचं म्हणणं आहे.
उच्च न्यायालयानं आपल्या अंतरिम आदेशात म्हटलं होतं की, ज्या महाविद्यालयांमध्ये महाविद्यालय समित्यांनी विद्यार्थ्यांचा ड्रेस कोड (Dress Code), गणवेश निर्धारित केलाय, तिथं धार्मिक कपड्यांवर बंदी आहे. गुरुवारी सकाळी मुस्लिम विद्यार्थिनी परीक्षा (Examination) देण्यासाठी कॉलेजमध्ये आल्या होत्या, तेव्हा त्यांचा विद्यार्थी आणि कॉलेज व्यवस्थापनाशी वाद झाला. डोक्यावर ओढणी न घालता मुख्याध्यापकांनी आम्हाला परीक्षा लिहायला दिली. आम्ही परीक्षा देत असताना काही विद्यार्थ्यांचा एक गट आला आणि आम्हाला खोली सोडण्यास सांगितलं, असा आरोप या विद्यार्थिनींनी केलाय.
पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, आंदोलक विद्यार्थी दुसऱ्या महाविद्यालयातील असून महाविद्यालयाचा निर्णय ऐकून ते इथं आंदोलन करण्यासाठी आले होते. याच वादामुळं गुरुवारी पी दयानंद पै महाविद्यालयातील पाच विद्यार्थिनीना परीक्षेला बसण्यास मज्जाव करण्यात आला. शुक्रवारपर्यंत आम्हाला या घटनेची माहिती देण्यात आली नव्हती. आम्हाला याची माहिती मिळताच आम्ही तिथं पोलिस तैनात केलं आणि हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला, असं मंगळुरूचे पोलिस आयुक्त एन शशी कुमार यांनी सांगितलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.