Karnataka Election Sakal
देश

Karnataka Election: कर्नाटकात हिजाब समर्थक फतिमा विजयी तर हिजाबबंदी करणाऱ्या भाजप मंत्र्याचा पराभव

कर्नाटक निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराने भाजप सरकारमध्ये शिक्षणमंत्री असलेल्या बीसी नागेश यांचा पराभव केला.

राहुल शेळके

Karnataka Election Result: कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या दणदणीत विजय झाला आहे. कर्नाटक निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराने भाजप सरकारमध्ये शिक्षणमंत्री असलेल्या बीसी नागेश यांचा 17,652 मतांनी पराभव केला. बीसी नागेश कर्नाटकातील हिजाब वादामुळे चर्चेत आले होते.

नागेश हे भाजपच्या बसवराज बोम्मई सरकारच्या काळात वादात सापडले होते. कर्नाटक बोर्डाच्या परीक्षेत मुलींना हिजाब घालून बसण्यास त्यांनी बंदी घातली होती.

काही मुस्लिम मुलींनी सरकारला पत्र लिहून परवानगी मागितली होती, पण त्यांना हिजाब घालून परीक्षा देण्याची परवानगी नव्हती. नंतर हे प्रकरण सुप्रीम कोर्टात पोहोचले.

बीसी नागेश हिजाबच्या मुद्द्यावर ठाम राहिल्यानंतर त्यांनी कुराण आणि बायबलसारख्या धार्मिक पुस्तकांबाबतही मोठे वक्तव्य केले आहे. आपल्या वक्तव्यात बीसी नागेश म्हणाले - बायबल आणि कुराणसारख्या धार्मिक पुस्तकांची भगवद्गीतेशी तुलना होऊ शकत नाही.

2021 मध्ये नागेश यांना बसवराज बोम्मई यांच्या मंत्रालयात समाविष्ट करण्यात आले आणि त्यांना प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मंत्री करण्यात आले होते.

निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, काँग्रेस 135 जागांसह राज्यातील सर्वात मोठा पक्ष बनला आहे. भाजपने 65 आणि जेडीएसने 19 जागा जिंकल्या आहेत, तर सर्वोदय कर्नाटक पक्ष आणि कल्याण राज्य प्रगती पक्षाने प्रत्येकी एक आणि अपक्षांनी दोन जागा जिंकल्या आहेत.

कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत बीसी नागेश यांचा तिप्तूर मतदारसंघातून पराभव झाला आहे. नागेश यांनी 2021 मध्ये प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मंत्रीपदाची सूत्रे हाती घेतली होती. नागेश यांना 53,753 मते मिळाली होती.

तिप्तूर मतदारसंघात नागेश यांचा काँग्रेस उमेदवार के शदक्षरी यांच्याकडून 17,652 मतांनी पराभव झाला.

नागेश यांच्या कार्यकाळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) संस्थापक केशव बळीराम हेडगेवार यांच्या मंत्रालयाने इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी सुधारित कन्नड पाठ्यपुस्तकात केलेल्या भाषणाचा समावेश केल्याने नागेश यांच्यावर टीका झाली होती.

कर्नाटकातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये हिजाब बंदीविरोधात आंदोलन करण्यात प्रमुख भूमिका बजावणाऱ्या काँग्रेस नेत्या कनीज फातिमा यांनी कर्नाटक विधानसभा निवडणुकीत गुलबर्गा उत्तर मतदारसंघातून विजय मिळवला आहे. फातिमा येथे भाजपचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांचा पराभव झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT