जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी कोर्टाच्या निर्णयाला निराशाजनक म्हटलंय.
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या हिजाब प्रकरणावर कर्नाटक उच्च न्यायालयानं (Karnataka High Court) आज (मंगळवार) महत्त्वाचा निकाल दिला. हिजाबच्या बंदीविरोधात (Hijab Controversy) कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकांवर सुनावणी करताना उच्च न्यायालयानं महत्त्वाची निरीक्षणं नोंदवली आहेत. शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब बंदी योग्यच आहे. हिजाब ही मुस्लिम धर्माचरणातील आवश्यक बाब नसल्याचं सांगत कर्नाटक उच्च न्यायालयानं यासंदर्भातील याचिका फेटाळून लावल्या. न्यायालयाच्या या निर्णयानंतर, जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती (Mehbooba Mufti) यांनी या निर्णयाला निराशाजनक म्हटलंय, तर केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केलाय.
उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळं राज्यपाल आरिफ मोहम्मद खान का खूश आहेत, त्यांच्या आनंदाचं कारण काय?
कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर, केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान (Governor Arif Mohammad Khan) यांनी यावर आनंद व्यक्त केलाय. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना ते म्हणाले, कोर्टाच्या निर्णयामुळं मी खूप खूश आहे. कर्नाटक उच्च न्यायालयानं समानतेच्या बाजूनं निर्णय दिलाय.
मनोरमाच्या अहवालानुसार, आपल्या आनंदाचं कारण सांगताना ते म्हणाले, इस्लाम धर्माचा पाया समानतेवर अवलंबून आहे. मात्र, एका षडयंत्राखाली महिलांना त्यांच्या हक्कांपासून नेहमीच दूर ठेवलं जात आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर, हुशार मुलींना चांगल्या संधी मिळतील, असं मला वाटतं.
एवढंच नाही, तर तिहेरी तलाकच्या बाबतीतही वेगवेगळे युक्तिवाद केले जात होते, पण तेही इस्लामला सुसंगत नाहीत. लोकांना हे समजायला खूप वेळ लागला. हिजाबच्या बाबतीत हे समजून घेणं देखील महत्त्वाचं आहे.
परिस्थिती कोण बिघडवत आहे? यावर ते म्हणाले, खरं तर हिजाबचा पुरस्कार करणारे लोक दुटप्पीपणा स्वीकारत आहेत. त्यांना स्वतःला हिजाबशिवाय जगायचं आहे; पण मुस्लिम मुलींना अंधारातच ठेवायचंय.
गेल्या महिन्यात त्यांनी या विषयावर आपलं मत व्यक्त केलं होतं. त्यांनी संपूर्ण हिजाब प्रकरणाला (Hijab Row Karnataka) 'षडयंत्र' म्हटलंय. मुस्लिम मुली सर्वच क्षेत्रात आपली चोख कामगिरी बजावत आहेत, म्हणून त्यांना प्रोत्साहनाची गरज आहे, असंही त्यांनी नमूद केलंय.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.