Himachal Election Result 2022 esakal
देश

Himachal Election Result : 'हिमाचल'चा पहिला निकाल हाती; CM जयराम ठाकूर यांनी जिंकली सहाव्यांदा निवडणूक

विधानसभा निवडणुकीत हिमाचलमध्ये 1985 च्या समीकरणाची पुनरावृत्ती होताना दिसत आहे.

सकाळ डिजिटल टीम

विधानसभा निवडणुकीत हिमाचलमध्ये 1985 च्या समीकरणाची पुनरावृत्ती होताना दिसत आहे.

Himachal Election Result 2022 : बहुचर्चित हिमाचल निवडणुकीचा पहिला निकाल समोर आलाय. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर (Jairam Thakur) यांनी सेराज विधानसभा मतदारसंघातून (Seraj Assembly Constituency) निवडणूक जिंकली आहे.

मुख्यमंत्री जयराम ठाकूर 20 हजारांहून अधिक मतांनी विजयी झाल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र, राज्यातील ट्रेंडमध्ये भाजप अजूनही पिछाडीवर असून काँग्रेस पक्ष 38 जागांवर आघाडीवर आहे. 68 विधानसभा जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीची मतमोजणी आज होत असून या निवडणुकीत भाजप (BJP) आणि काँग्रेसमध्ये निकराची लढत पाहायला मिळत आहे.

सेराज विधानसभेबद्दल बोलायचं झालं तर जयराम ठाकूर यांना 37,227 मतं मिळाली आहेत. तर, दुसऱ्या क्रमांकावर असलेले काँग्रेसचे (Congress) उमेदवार गीत राम यांना एकूण 9,755 मतं मिळाली. आम आदमी पक्षाच्या उमेदवार गीता नंद यांच्याबद्दल बोलायचं झालं, तर या विधानसभा जागेवर आप उमेदवाराला केवळ 230 मतं मिळाली आहेत.

हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. हिमाचलमध्ये आतापर्यंत 68 जागांचे ट्रेंड समोर आले आहेत. निवडणूक आयोगाकडून मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय जनता पक्ष केवळ 27 जागांवर आघाडीवर आहे, तर काँग्रेस 38 जागांवर आघाडीवर आहे. इतर 3 जागांवर अपक्ष उमेदवार पुढं आहेत. त्याचबरोबर आम आदमी पक्षाचं खातंही इथं उघडलेलं नाही.

हिमाचलमध्ये 1985 च्या समीकरणाची पुनरावृत्ती!

या विधानसभा निवडणुकीत हिमाचलमध्ये 1985 च्या समीकरणाची पुनरावृत्ती होताना दिसत आहे. सत्ताबदलाच्या काळात बदलत्या ट्रेंडनुसार, काँग्रेस पक्षाच्या बाजूनं जनादेश देण्याचं काम हिमाचलच्या जनतेनं केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT