Himachal Pradesh Assembly Election Result 2022
गुजरातमध्ये काँग्रेसची नाचक्की झालेली असली तरी हिमाचल प्रदेशमध्ये मात्र काँग्रेसला बहुमत मिळालं आहे. तब्बल ४० जागांवर काँग्रेसने यश मिळवलं असून भाजपला २५ जागांवर समाधान मानावं लागलं आहे. इतर काही राज्यांमध्ये भाजपने राबवलेलं 'ऑपरेशन लोटस'च्या धास्तीने काँग्रेसने उपाययोजना सुरु केल्यात. काँग्रेसच्या विजयी उमेदवारांची आज शिमल्यात महत्त्वपूर्ण बैठक आहे.
या बैठकीसाठी हिमाचलचे प्रभारी राजीव शुक्ला आणि पर्यवेक्षकसुद्धा पोहोचले आहेत. या बैठीकमध्ये मुख्यमंत्री कुणाला करायचं? या महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा होणार आहे. मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये प्रचार समिती प्रमुख सुखविंद्र सिंह सुक्खू आणि दिवंगत मुख्यमंत्री वीरभद्र सिंग यांच्या पत्नी प्रतिभा सिंग यांचं नाव पुढे येत आहेत.
हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेस दोन गटांमध्ये विखुरण्याची शक्यता आहे. काँग्रेस प्रचार समितीचे प्रमुख सुखविंद्र सिंग सक्खू यांच्या नेतृत्वामध्ये काँग्रेसने मोठा विजय मिळवला आहे. त्यांचा एक गट आणि दुसरा म्हणजे 'हॉलीलॉज'. हॉलीलॉज हा दिवंगत वीरभद्र सिंग यांचा बंगला आहे. त्यांची पत्नी मुख्यमंत्रीदासाठी अग्रेसर असल्याचं सांगितलं जातंय. हा गुंता नेमका कसा सुटतो हे पाहावं लागेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.